लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : देवपुरातील प्रभात नगरात चोरट्याने डल्ला मारत पोलिसाचे घर लक्ष केले़ घरातून रोकडसह दागिने लांबविल्याची घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली़नंदुरबार जिल्हा कारागृहात कार्यरत असलेले पोलीस हवालदार रामचंद्र सोमा रोकडे हे देवपुरातील प्रभात नगरात प्लॉट नंबर १४९ येथे राहतात़ चोरट्यांनी त्यांच्या घरात चोरी केल्याचे लक्षात आल्यानंतर घटनेची माहिती देवपूर पोलिसांना कळविण्यात आली़ पोलीस निरीक्षक सानप यांनी श्वान पथकासह ठसे तज्ञांना घेऊन घटनास्थळी भेट दिली़ चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असल्याने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करीत पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरु केला आहे़ दरम्यान, हवालदार रोकडे सकाळी घरी आले़ २५ ते ३० हजाराची रोकड, पाच तोळे सोने, ५० ग्रॅम चांदी असा ऐवज चोरीस गेल्याचे त्यांनी सांगितले़ त्यांनी देवपूर पोलिस ठाण्यात तशी फिर्याद दिली आहे़
प्रभात नगरमध्ये पोलिसाच्या घरात चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 13:02 IST