आमदार जयकुमार रावल, नगराध्यक्षा नयनकुवर रावल यांचा संकल्पनेतून अमरावती नदीकाठावर दोन्ही बाजूस रस्ता क्रॉक्रिटीकरण करण्यात आला आहे. या रस्त्याला - रामायण रचनाकार आद्य कवी महर्षी वाल्मिक ऋषी यांचे नाव द्यावे, अशी मागणी माजी नगरसेवक हितेंद्र महाले , माजी नगरसेवक नरेंद्र गिरासे, नरेंद्र कोळी, मनोज निकम , तुंबा कोळी, महेंद्र माळी, राहुल कोळी, शांताराम कोळी, ज्ञानेश्वर महाजन, हिरालाल कोळी, अनिल कोळी, जितू कोळी, संतोष महाजन, भटू कोळी, भय्यू कोळी, गोपाल चौधरी, विशाल कोळी, जिभाऊ महाजन, रवींद्र महाजन आदींनी केली आहे.यावेळी बाजार समिती सभापती नारायण पाटील,बांधकाम सभापती निखिल जाधव आदी उपस्थित होते.
दरम्यान या रस्त्याला आद्य कवी महर्षी वाल्मिक ऋषी देण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे आमदार जयकुमार रावल यांनी सांगितले.