शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

घरातच अध्यात्म व संगीताचा समृध्द वारसा संस्कार रूपाने मिळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 11:48 IST

पंडीत शेखर रूद्र यांची कृतज्ञता  : शास्त्रीय संगीताचा वारसा शिष्य म्हणून स्विकारून संगीताच्या ज्ञानदानाचा गुरूंचा मार्ग सांभाळण्याचा प्रयत्न  *गुरु पौर्णिमा विशेष *

वसंत कुलकर्णी।लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : आषाढ पौर्णिमा हीच गुरु पौर्णिमा व्यास पौर्णिमा  म्हणून आपण साजरी करतो आपल्या जीवनात गुरुचे महत्व अनन्यसाधारण आहे त्या गुरूंबद्दलची कृतज्ञतेचे महत्व अनेक संतांनी अधोरेखित केले आहे. आपल्या जीवनातील अंधकार दूर करून जीवनाला घडवण्याचे कार्य गुरु करत असतात. आपल्या आयुष्याला आकार देणा-या गुरूंचे स्मरण म्हणजे गुरुपौर्णिमा विश्वाचे  सार म्हणजे गुरु असं महत्व अभंगामध्ये वर्णित आहे. आमच्या घरातच गुरूंची समृद्ध परंपरा लाभलेली आहे. घराण्यातच संगीत आणि अध्यात्माचा वारसा संस्कार रूपाने बालपणा पासूनच मला लाभला आहे. आपल्याकडे जे काही ज्ञान म्हणून आहे ते समोरच्या शिष्याला देऊन टाकणारा गुरु असावा आणि सुदैवानं मला तशी गुरु परंपरा लाभल़ी़ माझे आजोबा श्री नारायण बुवा रुद्र ते  वडील श्रीरामबुवा रुद्र, आई पुष्पाताई रुद्र, भाऊ महाराज, सुनीता ताई रुद्र- भालेराव, जयश्री ताई ,सुलभाताई माझी मोठी बहीण सुनीता ताई अगदी तिसºया चवथ्या इयत्तेत सांस्कृतिक  कार्यक्रमात  मला तबला, हार्मोनियम ची साथ द्यायला सोबत न्यायच्या तेव्हा पासून संगीताची आवड मनात रुंजी घालायला लागली. पुढे नवव्या वर्गात दिलीप कुलकर्णी सरांकडे हार्मोनियमचे शास्त्रशुद्ध शिक्षणाचे धडे घेतले. नंतर अशोक कुलकर्णी सरांकडे शिष्य म्हणून गायनाचे धडे सुरु झाले. गुरुजींनी भरभरून सर्व काही दिले अतिशय शिस्तीत आणि आदर युक्त धाकात संगीत अलंकार झालो आज सर नाहीत याची खंत आहेच़ गुरु शिष्य यातील आदर युक्त भीती आज नाही चांगला शिष्य घडवण्यातली आजची सर्वात मोठी खंत झाली आहे. पुढे १२ वर्ष विविध गुरूंकडे शास्त्रशुद्ध शिक्षणाचे धडे घेतले ज्यात पुण्याचे डॉ. दिवाण, पंडित स.भ. देशपांडे, कोल्हापूरच्या भारती वैशंपायन धुळ्याच्या मंगलाताई कुलकर्णी या सर्वांपासून संगीताचा समृध्द वारसा अनुभवायला मिळाला़ ज्यात जीवनातला सगळं अंधकार नष्ट करणारे गुरु असतात.कालांतराने संगीताचे शिक्षण घेत असताना पुढे संगीत विशारद, संगीत अलंकार, एम.ए. संगीत, नेट आणि गेल्या जानेवारी महिन्यात जालना येथे परळीकर गुरुजींच्या हस्ते शास्त्रीय संगीतातील सर्वोच्च पंडित पदवी प्रदान करण्यात आली, याचा आनंद आहे. संगीताचा मूळ गाभा शास्त्रीय संगीत आहे आणि या गाभ्याची सेवा करण्याची संधी मला मिळाली आहे. विद्यार्थी हा सोने असतं तर गुरु हे  त्याचा परिस स्पर्श.सुदैवाने मला गुरु रूपाने असे परिस्पर्श लाभले ज्या मुळे गेली अठ्ठावीस वर्ष गुरु रूपाने संगीत कलेचं ज्ञानदान करून कलेची सेवा करता करत आहे. डॉ.बाळासाहेब नाईक यांनी धुळ्यात शास्त्रीय संगीताचा पाया रुजवला त्यांच्या नंतर शुभांगी पाटणकर या पुण्यात गेल्या नंतर गेली १२  वर्ष आदर्श संगीत विद्यालयाच्या माध्यमातून संगीत शिकवतोय माज्या सोबत माझी शिष्या व पत्नी कीर्ती रुद्र, संजीव कुलकर्णी, अनुजा जोग, दिनेश रुद्र या कलेची शिकवण इतर विद्यार्थ्यां न पर्यंत पोहचवण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे. संगीत विद्यालायत १७५ विद्यार्थी संगीत विशारद, ३ संगीत अलंकार  ज्यात डॉ. अरुंधती गजरे भारतात दुसरा क्रमांक मिळवला, १८ विदयार्थी एम ए संगीत झाले याचे समाधान आहे़ सत्तावीस वर्षा पासून एक कृतज्ञ सोहळा गुरुपौर्णिमा  उत्सवाच्या  निम्मिताने आयोजित करतो महाविद्यालयातून शिकून गेलेले शिष्य एकत्र येऊन  जेव्हा कला सादर करतात त्यावेळी गुरूबद्दलची कृतज्ञता ते व्यक्त करतात.  गुरु आशीर्वादच म्हणा की मला भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, पं.अजित कडकडे, पं़राजन साजन, पं.प्रभाकर करेकर यांच्यासारख्या महान कलावंतांच्या सोबत साथसंगत करण्याचा योग लाभला.  

टॅग्स :Dhuleधुळे