कोरोनाची महामारी, अभ्यासाची काहीशी अपुरी साधने, नवीन तंत्रज्ञानाने घेतलेली बदलत्या स्वरूपाची परीक्षा, ऐनवेळी धावपळ या सर्वांवर मात करीत कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी निकालाची यशस्वी परंपरा कायम राखली.
द्वितीय प्रथम वर्ष डिप्लोमा फार्मसीमध्ये प्रथम क्रमांक हर्षा एकनाथ खैरनार व प्रगती अशोक कोळी यांनी प्रत्येकी ९४.८० टक्के मिळवित पटकावला़ द्वितीय कृष्णा विशाल महाजन ९४.४०, तृतीय नंदीनी हुकूमचंद चौधरी ९३.९०, चतुर्थ शीतल मनोहर वाडिले ९३.६०, नीलिमा सुरेश महाजन ९२.३० टक्के मिळवीत यशाची पताका उंचावत ठेवली.
प्रथम वर्ष डिप्लोमा फार्मसीमध्ये प्रथम क्रमांक श्रद्धा गोकुळ पाटील ९४ टक्के, द्वितीय नाजुका रमेश चौधरी ९२.७३, तृतीय श्रुतिका नीना बोरसे ८९.०९, चतुर्थ पराग सुनील पाटील ८८.९१, पाचवी हेमांगी भाऊसाहेब माळी ८८.८२ टक्के मिळविले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष तथा माजी शिक्षणमंत्री अमरिशभाई पटेल, संस्थेचे कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण, संचालक चिंतनभाई पटेल, आरसीपी आईईआरचे प्राचार्य डॉ़ एस़ जे़ सुराणा, आरसीपी आईओपीचे प्राचार्य डॉ़ नितीन हासवाणी यांनी अभिनंदन केले़
याकामी प्रा़ अश्विन तोरणे, प्रा़ संगीता बडगुजर, प्रा. गोविंदा भंडारी, प्रा़ सुघोष उपासनी, प्रा़ प्रदीप पाटील, प्रा़ पूजा मुंदडा, प्रा़ युवराज पावरा, प्रा़ घनश्याम गिरनार, प्रा़ दीक्षिता पाटील, प्रा़ धनराज महाजन, दिनेश चौधरी, दीपक जाधव, सुजित राजपूत, अशोक पावरा, अक्षय पावरा यांचे सहकार्य लाभले.