महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने घेतलेल्या उन्हाळी २०२१ ऑनलाइन परीक्षेचा प्रथम व द्वितीय वर्षाचा निकाल नुकताच जाहीर झाला. किसान विद्या प्रसारक संस्थेचे महाराणी अहिल्याबाई होळकर डी.फार्मसी महाविद्यालयात प्रथम वर्षात प्रथम क्रमांक सेजल भटू पाटील हिने ८७़०९ टक्के, द्वितीय क्रमांक कल्याणी सुधीर पवार ८६़९१, तृतीय क्रमांक भावना नहीदे ८६़७३, कल्याणी भगवान पवार ८६़२७, रोहित सुरेश गोसावी ८५़२७ टक्के मिळविले.
द्वितीय वर्षात प्रथम क्रमांक सना सलीम शेख ९३़८०, द्वितीय क्रमांक नितीशा चौधरी ९१, तृतीय क्रमांक पल्लवी बाविस्कर ८७़८०, श्रेयस शिंपी ८५़५०, जयेश चौधरी ८३़९० टक्के गुण मिळवून यश संपादन केले़
गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष तथा धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ़ तुषार रंधे, संस्थेचे सचिव निशांत रंधे, खजिनदार आशाताई रंधे, बोराडी ग्रा़ पं. उपसरपंच राहुल रंधे, संस्थेचे संचालक श्यामकांत पाटील, कर्मवीर पतसंस्थेचे चेअरमन शशांक रंधे, नगरसेवक रोहित रंधे, प्राचार्य महेश पी. पवार, प्राचार्य डॉ़ पी़ एच़ पाटील, प्रा. कल्पेश वाघ यांनी अभिनंदन केले़
याकामी प्रा़ सतीश पाटील, प्रा़ चंद्रनील ईशी, प्रा़ हर्षल मिस्तरी, प्रा़ माधवी परदेशी, प्रा़ सागर कोळी यांचे मार्गदर्शन लाभले.