शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यातील फक्त तीन वाळू घाटांनाच प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 21:24 IST

गौण खनिज विभाग : १६ वाळू घाटांसाठी पुन्हा नव्याने ‘ई-लिलाव’ प्रक्रिया

ठळक मुद्देअल्प प्रतिसाद; उप्परपिंड १ व २, आच्छी २ वाळू घाटांचाच झाला लिलाव विभागीय आयुक्त कार्यालयाने अपसेट प्राईस निश्चित करून दिल्यानंतर १२ रोजी ई-लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र, केवळ तीनच वाळू घाटांना प्रतिसाद मिळू शकला.त्यात शिरपूर तालुक्यातील उप्परपिंड १ व २ व शिंदखेडा तालुक्यातील आच्छी २ या वाळू घाटांचा समावेश आहे. उप्परपिंड १ वाळू घाटासाठी ५७ लाख ५१ हजार ९९१ रुपये, तर उप्परपिंड २ वाळू घाटाला १ कोटी १३ लाख ५० हजार व आच्छी २ या वाळू घाटाला ७८ लाख ५८ हजार ७२३ रुपयांची प्राप्त माहितीनुसार उप्परपिंड १ वाळू घाटात १७६७ ब्रास, उप्परपिंड २ मध्ये ३५३४ ब्रास, तर आच्छी २ या वाळू घाटात २,४०३ ब्रास वाळू साठा उपलब्ध आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यात उपलब्ध वाळूसाठ्यांचा उपसा ठेकेदारांमार्फत करण्यासाठी  जिल्ह्यातील १९ वाळू घाटांसाठी नुकत्याच राबविण्यात आलेल्या ई- लिलाव प्रक्रियेला अल्प प्रतिसाद मिळाला. या प्रक्रियेंतर्गत केवळ शिरपूर तालुक्यातील दोन व शिंदखेडा तालुक्यातील एकाच वाळू घाटाला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आता जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील उर्वरित १६ वाळू घाटांसाठी पुन्हा नव्याने ‘ई- लिलाव’ प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला असून त्या दृष्टीने कार्यवाही सुरू केली आहे. गेल्या वर्षी देण्यात आलेल्या वाळू ठेक्यांची मुदत ३० सप्टेंबर २०१७ रोजी संपली होती. त्या पार्श्वभूमीवर नव्याने वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया राबविण्यासाठी प्रस्ताव तयार करून तो प्रस्ताव मंजुरीसाठी गौण खनिज विभागाने आॅक्टोबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविला होता. त्यानुसार विभागीय आयुक्तांनी जिल्ह्यातील १९ वाळू घाटांची अपसेट प्राईस मंजूर करून दिली होती. त्याची किंमत २१ कोटी ९६ लाख ६६ हजार ६८५ रुपये इतकी होती. जिल्ह्यातील १६ वाळू घाटांसाठी नव्याने लिलाव प्रक्रिया जिल्ह्यातील १६ वाळू घाटांसाठी नव्याने ई-लिलाव प्रक्रिया प्रशासनातर्फे राबविण्यात येत आहे. त्यासाठी  २६ डिसेंबरपर्यंत आॅनलाइन नोंदणी करावी लागणार असून, २ जानेवारीला या वाळू घाटांसाठी आॅनलाइन लिलाव प्रक्रिया होणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे. यंदा वाळू घाटांची अपसेट प्राईस वाढली गेल्या वर्षी २० वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया झाली होती. या वाळू घाटांसाठी १२ कोटी ५३ लाखांची अपसेट प्राईस निश्चित झाली होती. यंदा मात्र, १९ वाळू घाटांची अपसेट प्राईस ही २१ कोटी ९६ लाख ६६ हजार ६८५ रुपये निश्चित झाली आहे. गेल्या वर्षी २० वाळू घाटांसाठी लिलाव प्रक्रिया झाली होती. मात्र, त्यापैकी केवळ पाच वाळू घाटांच्या लिलावाला प्रतिसाद मिळाला होता. त्यात शिंदखेडा तालुक्यातील हिसपूर व वरली, शिरपूर तालुक्यातील उप्परपिंड, सावळदे व खर्दे खुर्द या गावांचा समावेश होता. वाळू घाटात पाणी असेल तर वाळू उपसा करू नये, असे हरित लवादाचे निर्देश आहेत. त्यामुळे यंदाही किती प्रतिसाद वाळू ठेकेदार देतात? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यंदा शिरपूर तालुक्यात सर्वाधिक १० वाळू घाट आहेत, तर साक्री- २ व शिंदखेडा येथे ५ वाळू घाटांचा समावेश आहे. 

१६ वाळू घाटांमध्ये उपलब्ध वाळूसाठा असा : (ब्रासमध्ये)

साक्री- दातर्ती १ (पांझरा नदी, ४२४० ब्रास वाळूसाठा), दातर्ती २ (पांझरा, ३१८०),शिंदखेडा- कमखेडा (तापी, १७६७), आच्छी १ (तापी, २४०३), हिसपूर १ (तापी, ३५३४),  हिसपूर २ (तापी, ३५३४),  टाकरखेडा (तापी ३५३४), साहूर (तापी, २६५०), शिरपूर : जापोरा (तापी, २६५०), पाथर्डे (तापी, ३५३४), खर्दे खुर्द (तापी, २२०८), सावळदे (तापी, ३५३४), कुरखळी -१ (तापी, ५३००), कुरखळी २ (तापी, ५३००), वाठोडे (तापी, २२०८), तºहाडी (तापी, ११४८)