लोकमत न्यूज नेटवर्ककासारे : साक्री येथील राज्य परिवहन महामंडळाच्या आगारात गुणवंत वाहक, चालकांचा सत्कार करण्यात आला. तसेच दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना व्हीलचेअर भेट देण्यात आल्या.साक्री तालुका प्रवासी महासंघातर्फे गुणवंत वाहक, चालक, मॅकेनिकल अशा २१ कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगाना बस स्टँड, रिक्षा व बसपर्यंत जाण्यासाठी साक्री आगारास तालुका प्रवासी महासंघाच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते सलीम शेख यांच्या सौजन्याने व्हीलचेअर भेट देण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रवाशी महासंघाचे तालुकाध्यक्ष सुरेश पारख होते. कार्यक्रमास महासंघाचे उपाध्यक्ष डॉ.दिलीप चोरडिया, मंगला पारख, सचिव बाळकृष्ण तोरवणे, प्राचार्य बी.एम. भामरे, पी.झेड. कुवर, प्राचार्य डॉ. राजेंद्र आहिरे, सुहास सोनवणे, विलास देसले, आगार प्रमुख पंकज देवरे, सलीम शेख आदी उपस्थित होते.सलिम शेख यांनी व्हील चेअर भेट दिल्याबद्दल त्यांचा व फरिद पठाण यांचा सुरेश पारख, पदाधिकारी व आगार प्रमुख पंकज देवरे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. तसेच साक्री आगारातील गुणवंत मेकॅनिकल सी.एच. देशमुख, के.बी. कुवर, ए.बी. रणदिवे, चालक शरद शिंदे, फरीद पठाण, प्रकाश शिंदे, शशिकांत देवरे, अर्जुन पाटील, महेंद्र देवरे, वाहक राहुल कुंभारे, लक्ष्मण ठाकरे, गजमल पाडवी, नरेंद्र चव्हाण, मालती मोरे, रतिलाल साळुंखे, सोनाली जगताप, संगीता बागुल, दिनेश नेरकर यांचा सत्कार झाला. डॉ.राजेंद्र अहिरे, पंकज देवरे, सुरेश पारख, बाळकृष्ण तोरवणे, पी. झेड. कुवर आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक व सूत्रसंचलन प्राचार्य बी.एम. भामरे, यांनी केले, आभार सुहास सोनवणे यांनी मानले.
गुणवंत वाहक, चालकांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 12:55 IST