धुळे :मुले दत्तक घेऊन त्यांचे संगोपन करणाºया पालकांचा नुकताच बालदिनाचे औचित्य साधून सत्कार करण्यात आला. हळदीकुंकु महिला मंडळातर्फे सावित्रीबाई फुले पुतळ्याजवळ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेविका प्रतिभा चौधरी होत्या.या कार्यक्रमात धोंडाबाई बाबुराव चौधरी, बनाबाई भालचंद्र चौधरी, अविनाश गोविंदराव देवरे, राधा देवरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जळगाव येथे ‘हळदी-कुंकू’ नाटीका सादर करणाºया महिलांचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. अविनाश देवरे यांनी सादर केलेली गवळण तसेच रेखा बारी यांनी ‘हसा मुलांनो हसा’ या गीताने कार्यक्रमाची सुरूवात झाली होती. सूत्रसंचालन मीनाक्षी सोनवणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी निलिमा दीक्षित, कल्पना सोनार, प्रिया भदाणे, निलाक्षी बारी, विजया चौधरी, विमल पाटील, शुभांगी भदाणे, सुमती बारी, उन्नती चौधरी, नगरसेवक नागसेन बोरसे, भरत वाघारे, अक्षय जाधव, संदीप बारी, तुषार पदमर, तुषार कारंजेकर, मनीषा पाटील यांचे सहकार्य लाभले.
दत्तक मुलांचे संगोपन करणाऱ्या पालकांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 11:35 IST