शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

विखरणचे धर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांना वाढीव मोबदला देण्यासाठी शासनाला देणार अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 16:22 IST

प्रशासकीय यंत्रणा गतिमान; अहवाल तयार करण्यासाठी कृषी विभागाला आदेश

ठळक मुद्देविखरण शिवारात धर्मा पाटील यांची गट क्रमांक २९१/२ अ या ठिकाणी पाच एकर शेती होती. त्यांच्या या क्षेत्राला लागून असलेल्या शेतमालकास १ कोटी ८९ लाख रुपयांचा मोबदला मिळाला होता. त्यामुळे समान न्याय मिळायला हवा, त्यासाठी धर्मा पाटील यांचा संघर्ष सुरू होता.धर्मा पाटील यांच्या निधनानंतर मंगळवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत विखरण-मेथी शिवारात झालेल्या जमीन संपादन व लाभार्थ्यांना दिलेल्या मोबदल्याविषयी सविस्तर माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्थानिक अधिकाºयांकडून जाणून घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे, उपजिल्हाधिकारी पंकज चौबळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सांगळे आदी उपस्थित होते. या बैठकीत शेतकरी धर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांना वाढीव मोबदला देण्यासाठी सुधारित प्रस्ताव १मंत्रालयस्तरावर झालेल्या बैठकीनंतर जिल्हा प्रशासनाने कृषी विभागाला फेरप्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचा अहवाल शासनाला सोमवारपर्यंत दिला जाणार आहे. त्यानुसार कृषी विभागामार्फत मेथी व विखरण शिवारात औष्णिक प्रकल्पासाठी झालेल्या जमीन संपादनाच

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे :  शिंदखेडा तालुक्यातील विखरण येथील धर्मा पाटील यांच्या जमिनीचा योग्य मोबदला त्यांच्या कुटुंबीयांना देण्यासाठी शासनाने जिल्हा प्रशासनाला सुधारित प्रस्ताव १५ दिवसाच्या आत सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यापार्श्वभूमीवर प्रशासकीयस्तरावर कार्यवाहीला सुरुवात झाली आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने कृषी विभागाला जमीन संपादन व तत्कालीन अधिकाºयांनी केलेले पंचनाम्यांचा अहवाल तयार करण्याचे सांगितले आहे.  यासंदर्भात तयार केलेला अहवाल हा जिल्हा प्रशासनामार्फत सोमवार, ५ रोजी शासनाकडे सादर केला जाणार असून त्यानंतर पुढील निर्णय शासनाकडून घेण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. शिंदखेडा तालुक्यातील मेथी-विखरण येथे औष्णिक ऊर्जा प्रकल्पासाठी जमिनीचे संपादन करण्यात आले होते. परंतु, या प्रक्रियेनंतर विखरणचे शेतकरी धर्मा पाटील यांना जो मोबदला मिळाला. तो कमी व अतिशय तुटपुंजा स्वरूपात होता. त्यासाठी धर्मा पाटील यांनी न्याय मागण्यासाठी प्रशासन व शासकीयस्तरावर पाठपुरावा सुुरू ठेवला होता. परंतु, त्यात त्यांना यश मिळत नव्हते. त्यामुळे नैराश्यात येऊन त्यांनी थेट मंत्रालय गेल्यानंतर विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. शासनाने घेतली दखल धर्मा पाटील यांनी विष प्रशान केल्यानंतर त्यांचा मृत्यूशी संघर्ष सुरू होता. गेल्या सोमवारी त्यांचे निधन मुंबईत झाले. या घटनेनंतर त्यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांनी न्याय मिळत नाही. तोपर्यंत त्यांचे पार्थिव उचलणार नाही, असा पवित्रा घेतला. त्याची गंभीर दखल शासनाने घेतली होती. धर्मा पाटील यांच्या निधनापासून पुढे ३० दिवसाच्या आत न्याय मिळवून देण्यात येईल, असे आश्वासन त्यांचा मुलगा नरेंद्र यांना देण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाला विखरण-मेथी शिवारात औष्णीक ऊर्जा प्रकल्पासाठी जी जमीन संपादीत करण्यात आली आहे, त्याची कागदपत्रे व पंचनाम्यांची पडताळणी करून त्याचा अहवाल जिल्हाधिकाºयांनी तातडीने सादर करावा असे निर्देश देण्यात आले होते.शासन आदेशानुसार प्रशासकीयस्तरावर कार्यवाहीला सुरुवात झाली आहे. तसेच यासंदर्भात कृषी विभागालाही सूचित करण्यात आले आहे. त्यानुसार जमीन संपादन व इतर आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून त्याचा अहवाल हा शासनाकडे येत्या दोन ते तीन दिवसात दिला जाणार आहे. त्यानंतर पुढील निर्णय हा शासनस्तरावर घेण्यात येईल.     - रवींद्र भारदे,     उपजिल्हाधिकारी (भूसंपादन)