शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

गावांना जोडणाऱ्या पुलाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2019 11:06 PM

तिसगाव : पुलावरुन पाणी वाहिल्यास तुटतो संपर्क, संरक्षण कठडे नसल्याने धोकेदायक

तिसगाव : धुळे तालुक्यातील तिसगाव ते ढंडाने या दोन गावांना जोडणाºया भात नदीवरील फरशी पुलाची पार दुरवस्था झाली आहे. पुरामुळे या पुलावरुन पाणी वाहत असल्यास या दोन्ही गावांचा संपर्क तुटतो. पुलावर संरक्षण कठडे नसल्याने येथे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.तिसगाव ते ढंडाने या गावांच्या मध्ये वन विभागातून उगम पावणारी भात नदी वाहते. सतत पाच महिने वाहणारी ही जिल्ह्यातील एकमेव नदी आहे. नगावहून ५ कि.मी. अंतरावर तिसगाव, ढंडाने गाव आहे. तेथून नदी ओलांडली की वडेल गाव आहे.नगाव ते सायने दरम्यान, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत दोन वर्षापूर्वीच रस्त्यांची कामे झाली आहे. लहान- मोठे नाल्यावर देखील सात ते आठ पुलांचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र, आणि तिसगाव ते ढंडाने या भात नदी काठावरील गावाच्या पुलाची पार दुरवस्था झालेली असताना त्याकडे दुर्लक्ष होत आहे. या गावातील भात नदीवर मोठा पुल का बांधण्यात येत नाही, असा प्रश्न तिसगाव, ढंडाने, वडेल येथील ग्रामस्थांना भेडसावत आहे.दुसरीकडे याच भात नदीवर नगाव ते सायने रस्त्यावर मोठी वाहतूक नसताना सुद्धा तेथे मोठा पूल बांधण्यात आला आहे आणि तिसगाव ढंडाने व वडेल या गावांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे. या गावाची लोकसंख्या सुमारे २५०० आहे. दोन्ही गावात शेकडो दुचाकीसह, लहान-मोठी वाहने आहेत. तरी देखील तिसगाव आणि वडेल गावालगतच्या पुलांचे काम होत नाही. पाऊस झाला की फरशी पुलावरुन पाणी वाहत असल्याने या दोन्ही बाजूच्या गावांचा संपर्क तुटतो.या पाण्यामधून जर ये - जा करायची ठरविले तर या पुलाला संरक्षण कठडे देखील नाहीत त्यामुळे येथे मोठी दुर्घटना देखील घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामस्थांना घरी कसे जायचे, असा प्रश्न असतो. २५ ते ३० वर्षांपूर्वी या फरशीवजा पुलाचे बांधकाम झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. आता ही फरशी इतकी जीर्ण झाली आहे की वाहून येणाºया पाण्याने काही भाग तुटला आहे. तर बाजूच्या भिंतीवर वड, पिंपळाची झाडे उगवली आहेत तर दुसºया बाजूने मोठा गाळ साचलेला आहे. पुरामुळे फरशीवजा पुलावरील डांबरीकरण पूर्णपणे उखडले आहे.लवकरात लवकर या पुलांचे काम सुरू व्हावे, अशी मागणी तिसगाव ढंडाने येथील विजय पाटील, दीपक पाटील, रविंद्र पाटील, शिवाजी आहिरे ,दिनेश भामरे, बापू भामरे, भीमा हटकर, लोटन हटकर, नितीन शिरसाठ, आबा कायखेडकर, खंडू कापडणे, सुजित भामरे यांच्यासह परिसरातील वाहनधारक व ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :Dhuleधुळे