महापालिकेत तीन वर्षांपूर्वी अकरा गावांचा समावेश करण्यात आला आहे. ग्रामपंचायतीनंतर ११ गावांमध्ये मूलभूत सोयी-सुविधा पुरविण्याची जबाबदारी मनपाची आहे. ग्रामपंचायतीनंतर मनपाकडे गावाचे हस्तांतरण झाल्यानंतर येथील स्मशानभूमीची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती.
वलवाडी गावाची लोकसंख्या सुमारे १० ते ११ हजार आहे. अत्यसंस्कार करण्यासाठी शहरासह वलवाडी, भोकर गावांचा संपर्क येतो. मात्र येथील स्मशानभूमीत अत्यसंस्कार करण्यासाठी साेयी-सुविधांसह बैठक व्यवस्था नसल्याने नातेवाइकांना देवपूर येथील एकवीरा देवी मंदिरातील स्मशानभूमीत जावे लागत होते. नागरिकांच्या मागणीनुसार नगरसेविका वंदना भामरे यांनी महापाैर चंद्रकांत सोनार यांच्याकडे स्मशानभूमीची दुरुस्ती व नूतनीकरणाची मागणी केली होती. त्यानुसार शुक्रवारी उपायुक्त गणेश गिरी यांनी स्मशानभूमीची पाहणी करीत मनपाकडे दुरुस्तीचा आदेश पाठविला होतो. या वेळी नगरसेविका वंदना भामरे, नगरसेवक ००००० आदी उपस्थित होते.
वलवाडी व भोकर येथील स्मशानभूमीची संरक्षक भिंत, पाण्याची व टाकीची व्यवस्था, सभामंडप, प्रवेशद्वार दुरुस्ती, अंत्यविधी सभामंडप व ओट्याची दुरुस्ती, परिसरात पथदिवे तसेच संपूर्ण स्मशानभूमीचे रंगकाम केले जाणार आहे. यासाठी कायमस्वरूपी स्वच्छता कर्मचारी नियुक्त केला जाणार आहे.