लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील जवाहर कुस्ती स्टेडियचे नूतनीकरण करून कुस्तीपटूसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात यावे या मागणीसाठी तालुका तालीम संघाच्या वतीने मंगळवारी महापौर चंद्रकांत सोनार यांना निवेदन देण्यात आले़यावेळी गोरख पाटील, नगरसेवक नागसेन बोरसे, नगरसेवक देवेंद्र सोनार, मुरलीधर लोकरे, वसंत हाराळ, रविंद्र माळी, नंदलाल फुलपगारे, संदीप पाटोळे, नगरसेवक विजय जाधव, दिनेश बागुल, समीर गवळी, राम कानडे, शाम कानडे, महेश माळी, आकाश परदेशी, प्रवीण जाधव, सनी वाघ, जगदीश सरोदे, कैलास कासार आदी उपस्थित होते. जवाहर कुस्ती स्टेडियमची दुरवस्था झाली आहे़जवाहर कुस्ती स्टेडियमचे नूतनीकरण केल्यास कुस्तीपटूसाठी स्वंतत्र व्यासपीठ उपलब्ध होऊ शकते़ देखरेख व नियोजनासाठी मनपाने एक विशिष्ट समिती स्थापन करण्याची मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली़
जवाहर स्टेडियमचे नुतनीकरण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 12:37 IST