सदर निवेदनात पाष्टे गावातील वीजपुरवठा रात्रीबेरात्री केव्हाही, कोणतीही पूर्वसूचना न देता खंडित केला जातो. पाष्टे ग्रामस्थ यांची मागणी आहे की, वेळोवेळी होणाऱ्या खंडित वीजप्रवाहाबाबत ताबडतोब सुधारणा करण्यात यावी. पाष्टे गावातील वारंवार रात्रीबेरात्री खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा; तसेच नरडाणा, बेटावद, वारूळ या गावांतील विद्युत पुरवठा नियमित सुरू असतो. मग पाष्टे, म्हळसर, मुडावद या तिन्ही गावांचाच वीजपुरवठा वेळोवेळी खंडित करण्यात येतो. यापूर्वी बेटावद नरडाणा येथील कार्यालयात लेखी व तोंडी सूचना दिलेल्या आहेत. असे असताना विद्युत पुरवठा सुरळीत करण्याबाबत काहीही कार्यवाही केली जात नाही.
सदरचा वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबत आठ दिवसांत कार्यवाही न झाल्यास पाष्टे ग्रामस्थ आपल्या कार्यालयावर मोर्चा काढतील याची नोंद घ्यावी आणि एकही ग्रामस्थ वीज बिल भरणार नाहीत. काही गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपल्या कार्यालयाची राहील, याची गंभीर स्वरूपाची नोंद घ्यावी. सदर निवेदन देण्यासाठी मा. सरपंच मधुकर शिरसाठ, रावसाहेब पाटील, युवराज बैसाणे, पंकज सोनवणे, जगदीश ठाकरे, राहुल शिरसाठ, कपिल पाटील, रोहित पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.
140921\img-20210914-wa0011.jpg
नरडाणा विद्युत मंडळाचे उपकार्यकारी अभियंता गणेश अस्मार यांना निवेदन देताना मा. सरपंच मधुकर शिरसाठ, रावसाहेब पाटील, युवराज बैसाणे,पंकज सोनवणे, जगदीश ठाकरे, राहुल शिरसाठ, कपिल पाटील, रोहित पाटील व ग्रामस्थ