शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

भरकटलेल्या दोन बालकांना केले नातेवाईकांच्या स्वाधीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 11:49 IST

धुळे रिमांड होमच्या कर्मचाºयांना यश : खडतर प्रवास करून घेतला शोध, बालकांना पाहताच कुटुंबियांना झाला आनंद

ठळक मुद्देदोघ बालक घरातून होते बेपत्तापोलीस स्टेशनमध्ये नोंदही नव्हतीकर्मचाºयांनी परिश्रम घेत पालकांचा पत्ता शोधला

आॅनलाईन लोकमतधुळे : भाषेची अडचण...दोघ मुलांना  पत्ताही धड सांगता येत नव्हता...अशाही परिस्थितीत बालगृहाच्या दोघ कर्मचाºयांनी  पहाडी भागात जाऊन, भरकटलेल्या मुलांना त्यांच्या नातेवाईकाच्या स्वाधीन केले. अनेक वर्षानंतर मुलांना बघितल्यावर नातेवाईकांच्या चेहºयावरही आनंद ओसांडून वाहत होता.धुळे येथील मुलांच्या निरीक्षण गृह/बालगृह (रिमांड होम)मध्ये कृष्णा दिनेश कुमार (पावरा)(वय १५), व विशाल सिंध्या बामणे (वय १३) हे दोन महिन्यांपासून दाखल झाले होते.कृष्णाचे वडील नरडाणा येथे कामाला होते. तेथूनच तो सहा वर्षांपूर्वी घरातून गायब झाला होता. कृष्णा रेल्वेत बसून मुंबई व तेथून हैद्राबादला गेला होता. तेथे तो रेल्वेत बसला होता.  मात्र लहान मुलगा एकटा रेल्वेत बसल्याचे पाहून, तेथील पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याला  बाल कल्याण समिती हैद्राबाद येथे दाखल केले. त्यांच्या मार्फतच तो २९ जानेवारी १८ रोजी धुळे रिमांड होममध्ये दाखल झाला. तर विशाल हा गेल्या एक-दीड वर्षांपासून गायब होता. तो बाल कल्याण समिती मुंबई यांच्यामार्फत ३ मार्च १८ रोजी येथील  रिमांड होममध्ये दाखल झाला होता. विशेष म्हणजे दोघांच्या गायब होण्याबाबत पोलीस स्टेशनला नोंदही नव्हती. त्यामुळे त्यांच्या पालकांचा, नातेवाईकांचा  शोध घेणे जिकरीचे होते. पोलीसही दोघांच्या पालकांचा शोध घेत होते, मात्र शोध लागला नाही.अखेर बालगृहाच्या प्रभारी अधीक्षिका यु.एस. सैंदाणे, योगा शिक्षक राजदीप पाटील, यांनी संस्थेचे सचिव डॉ. एस.टी.पाटील यांच्याशी चर्चा करून बालकांच्या पालकांचा शोध घेण्यासाठी संस्थेतील दोन कर्मचाºयांची नियुक्ती केली.बाल कल्याण समिती धुळ्याच्या अध्यक्षा रत्नमाला पाटील, सदस्या उषा साळुंखे यांचे आदेश घेऊन संस्थेचे दोन कर्मचारी बालकांना सोबत घेऊन शिरपूर परिसरात गेले. बालगृहातील कर्मचारी राकेश पाटील व किसन पावरा यांनी पहाडी भागात खडतर  प्रवास सुरू केला. आजुबाजुच्या गावात, पाड्यांमध्ये तसेच बोराडी येथील पंडित नेहरू शाळेतील लिपीक, कर्मचाºयांशी संपर्क साधला.  हे करत असतांना एका बालकांने या कर्मचाºयांची दिशाभूल करत उलट दिशेचा रस्ता दाखवला.मात्र ग्रामस्थांनी हा बालक चुकीची माहिती देत असल्याचे कर्मचाºयांच्या लक्षात आणून दिले. मात्र तरीही कर्मचाºयांनी संयम ठेवला. त्यांनी पाड्यांवरील लोकांची मदत घेऊन तपास करीत, बालकांच्या पालकांचा पत्ता मिळविला.कृष्णा हा शिरपूर तालुक्यातील बोराडी गावापासून पाच किलोमीटर अंतरावरील पाड्यावर राहत होता. त्याठिकाणी हे कर्मचारी पोहचले. कृष्णाचे पालक हे मजुरीनिमित्त सुरतला गेल्याचे समजले. या कर्मचाºयांनी कृष्णाला त्याच्या मामाच्या स्वाधीन केले.त्यानंतर अजून ३० किलोमीटरचा प्रवास करीत हे दोघ कर्मचारी मलगाव या पहाडी गावात पोहचले. त्याठिकाणी विशालला वडील, आजी, आजोबाच्या स्वाधीन केले. बालकांना पहाताच त्यांच्या नातेवाईकांच्या चेहºयावर आनंद ओसांडून वाहत होता. तर एकाच दिवशी दोन्ही बालकांना त्यांच्या पालकाच्या ताब्यात दिल्याने, घेतलेल्या प्रयत्न व कष्टाचे चीज झाल्याचे समाधान राकेश पाटील व किसन पावरा यांना मिळाले.