येथील अप्पर तहसील कार्यालय येथे उपविभागीय अधिकारी भीमराव दराडे यांच्या अध्यक्षतेखाली कोविड-१९ लसीकरणासंबंधी आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.
तसेच ४५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना सोमवार, बुधवार व शुक्रवारी लसीकरण करण्यात येईल तर १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना मंगळवार, गुरुवार व शनिवार या दिवशी लसीकरण करण्यात येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली. ऑनलाइन प्रक्रियेसाठी नागरिकांना प्रोत्साहित करून जास्तीत जास्त ऑनलाइन रजिस्ट्रेशन नागरिकांकडून करून घ्यावे, अशा सूचना उपविभागीय अधिकारी भीमराव दराडे यांनी केल्या.
यावेळी अपर तहसीलदार विनायक थविल, सहायक पोलीस निरीक्षक सचिन साळुंके, सरपंच देविदास सोनवणे, माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड. ज्ञानेश्वर एखंडे, तालुका वैद्यकीय अधिकारी कुलसिंग तडवी, पिंपळनेर वैद्यकीय अधिकारी डॉ. राकेश मोहने, पिंपळनेर ग्रामविकास अधिकारी डी.डी. चौरे, सामोडे ग्रामविकास अधिकारी बी.डी. जगताप, रवींद्र सोनवणे आदी उपस्थित होते.