शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

जगप्रसिद्ध अजिंठा लेणीकडे पर्यटकांची पाठ

By admin | Updated: April 10, 2017 16:21 IST

वाढलेले तापमान, मुलभूत सुविधांचा अभाव व वाढलेल्या प्रवेश शुल्का मुळे जगप्रसिध्द अजिंठा लेणीकडे देशी व विदेशी पर्यटकांनी पाठ फिरविली आहे.

 मुलभूत सुविधांचा अभाव : हॉटेल व रिसॉर्ट व्यवसायावर परिणाम

फदार्पूर,दि.10- वाढलेले तापमान, मुलभूत सुविधांचा अभाव व  वाढलेल्या प्रवेश शुल्का मुळे जगप्रसिध्द अजिंठा लेणीकडे देशी व विदेशी पर्यटकांनी पाठ फिरविली आहे. त्यामुळे महिनाभरापासुन या ठिकाणी शुकशुकाट जाणवत आहे. यामुळे परीसरातील व्यावसायीक चांगलेच अडचणीत आले आहे.
प्रत्येक वर्षी ऑक्टोंबर ते जानेवारी व एप्रिल ते जुन या कालावधीत अजिंठा लेणीमध्ये पर्यटकांची वर्दळ असते. एप्रिल मध्ये उन्हाळी सुटय़ा लागत असल्याने या काळात पर्यटकांची चांगली गर्दी असते. या काळात दररोज हजारो पर्यटक अजिंठा लेणीला भेट देत असतात. मात्र यावर्षी जानेवारी महिन्यानंतर लेणी कडे पर्यटकांनी जी पाठ फिरवली ती एप्रिल महिना लागला तरी कायम आहे. पर्यटक भेटी देतील या आशेने अनेक लहान मोठय़ा व्यापा:यांनी खाजगी कर्ज तसेच नातेवाईक, मित्र मंडळी कडुन उसनवारीने पैसे घेवून आपल्या दुकानात माल भरुन घेतला. आता पर्यटक नसल्याने हे कर्ज कसे परत करावे ही चिंता व्यावसायिकांना आहे.
 हॉटेल्स आणि रिसॉर्ट रिकामेच  
देशी व विदेशी पर्यटकांच्या सुविधेसाठी फदार्पूर (ता.सोयगाव) येथे  एमटीडीसी सह अनेक खाजगी हॉटेल्स व रेसॉर्ट आहेत. मात्र सध्या पर्यटक नसल्याने हे सर्व हॉटेल्स व रिसॉर्ट ओस पडले आहेत. हे हॉटेल्स व रिसॉर्ट चालविण्यासाठी दररोज लागणारा हजारो रुपयाचा खर्च व कर्मचा:यांचे वेतन कसे काढावे या चिंतेत येथील हॉटेल व्यावसायीक आहे.
अजिंठा लेणीतील पर्यटन घसरण्याची प्रमुख कारणे
सध्या उन्हाचा पारा वाढला आहे. त्यामुळे अजिंठा लेणीतील पर्यटकांची संख्या घटली असे म्हटले जात आहे. मात्र ऑक्टोंबर ते जानेवारी च्या कालखंडात ही गेल्या काही वर्षा च्या तुलनेत अजिंठालेणीत अत्यंत कमी पर्यटकांनी भेट दिली आहे. येथे येणा:या पर्यटकांना मिळणा:या मुलभुत सुविधांचा अभाव हे देखील आहे. लेणीत येणा:या हजारो पर्यटकांना उन्हापासून संरक्षण मिळावे यासाठी कोणतीही सुविधा नाही. पिण्याच्या पाण्यासाठी पर्यटकांना अनेक ठिकाणी भटकंती करावी लागते.  काही महिन्यांपासून तिकीट दरात व सुविधा शुल्कात  भरमसाठ वाढ झाली आहे. अजिंठालेणी बघण्यासाठी एका भारतीय पर्यटकाला सुमारे 114 रुपये तर विदेशी पर्यटकांना 584 रुपये मोजावे लागतात (हा खर्च केवळ 4 किमी च्या अंतरात प्रति व्यक्ती करावा लागतो ). फदार्पूर टि.पॉईंट ते अजिंठालेणी या चार किमी च्या अंतरात रस्त्याची मोठय़ा प्रमाणात दुरवस्था झाली आहे. (वार्ताहर).