शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

रवी देवांग यांचे हृदयविकाराने निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 22:40 IST

शेतकरी संघटना : आज धुळ्यात अंत्यसंस्कार

ठळक मुद्देधुळे तालुक्यातील डेडरगाव येथे स्थापन झालेल्या विपश्यना केंद्राचे ते संस्थापकशेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांचे खंदे समर्थक व माजी अध्यक्ष पदही त्यांनी भुषविलेमहाविद्यालयीन आयुष्यात ते उत्कृष्ट खो-खो पटू होते. त्यांनी राज्यस्तरावर नेतृत्व केले होतेते शेतकरी संघटनेशी २५ वर्षांपासून जुळलेले होते. तत्पूर्वी ते राष्टÑ सेवादलात कार्यरत होते. ते नर्मदा बचाव आंदोलनाशीही संलग्न होते

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांचे खंदे समर्थक व माजी अध्यक्ष रवी जगन्नाथ देवांग (६२) यांचे शेगाव येथे मंगळवारी सायंकाळी ७ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने  निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा बुधवार १३ रोजी सकाळी ११ वाजता देवपूरातील विद्यानगर भागातील शास्त्री नगर येथील त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे. संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांच्या स्मृतिदिनानिमित्त शेगाव येथे मंगळवारी महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या मेळाव्यास ते उपस्थित होते. संध्याकाळी मेळावा संपल्यानंतर कार्यकर्त्यांशी त्यांच्या भेटीगाठी झाल्या. त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यात त्यांचे निधन झाले. रवी देवांग हे शेतकरी संघटनेशी गेल्या २५ वर्षांपासून जुळलेले होते़ संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांचे ते खंदे समर्थक होते. सन २०१० ते १४ अशी चार वर्षे त्यांनी संघटनेचे अध्यक्षपद भूषविले. त्यांनी शेतकरी संघटनेतर्फे धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून निवडणूकही लढविली होती. तसेच ते नर्मदा बचाव आंदोलन, राष्ट्रसेवा दल यांच्याशीही संलग्न होते. रवी देवांग यांनी पुणे विद्यापीठातून बी़ई़ सिव्हील ही पदवी संपादन केली होती़ त्यांनी सुवर्णपदक प्राप्त केले होते. त्यांचा जन्म १८ डिसेंबर १९५५ रोजी झाला होता़ तालुक्यातील डेडरगाव येथे स्थापन झालेल्या विपश्यना केंद्राचे ते संस्थापक होते. ते विपश्यनेसाठी या केंद्रावर तसेच इगतपुरी येथील मुख्य केंद्रावरही जात होते. त्यांनी अध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रांसाठी आपले जीवन समर्पित केले होते. ते अविवाहित होते. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. रात्री उशीरा त्यांचे पार्थिव धुळ्यात त्यांच्या राहत्या घरी आणण्यात येणार आहे. बुधवारी सकाळी ११ वाजता राहत्या घरापासून निघणार असल्याची माहिती त्यांचे लहान बंधू विवेक देवांग यांनी दिली.