शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यात रावण दहन करण्याची परवानगी देवू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 12:01 IST

आदिवासी एकता परिषदेतर्फे जिल्हा प्रशासनाला निवेदन

आॅनलाइन लोकमतधुळे : राजा रावण हे आदिम संस्कृतीचे श्रद्धास्थान व दैवत आहे. न्यायप्रिय राजा रावणाला जाळण्याची कुप्रथा व परंपरा जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आलेली आहे. त्यामुळे देशातील आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या जातात. त्यामुळे रावण दहन करण्याची परवानगी कोणालाही देण्यात येवू नये अशी मागणी आदिवासी एका परिषदेच्या शिंदखेडा शाखेतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनात म्हटले आहे की, राजा रावणासारखा महापराक्रमी योद्धा झाला नाही. तामिळनाडूत रावणाची ३५२ मंदिरे आहेत. सर्वात मोठी मूर्ती मध्यप्रदेशात आहे. अनेक राज्यांमध्ये रावणाची पूजा केली जाते. रावण हा महाज्ञानी व विद्वान असल्याने आदीवासी समाजात पुजनीय आहे. आदिवासींच्या भावान दुखावल्या जाऊ नयेत, समाजात तेढ निर्माण होऊ नये यासाठी रावण दहन प्रथा बंद करावी.निवेदनावर प्रेमचंद सोनवणे, गुलाब सोनवणे, शानाभाऊ सोनवणे, नाना महाले, राजन वाघ, गणेश मोरे, दीपक सोनवणे,भैय्या मोरे, दीपक देसाई, पिंटू पवार, रामदास सोनवणे, आबा अहिरे, गंगाराम बागूल, भाऊसाहेब भिल, गोकूळ गायकवाड यांच्यासह अनेकाच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टॅग्स :Dhuleधुळे