शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

शिंदखेडा येथे थुंकण्याच्या कारणावरून रसवंती चालकास जबर मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 11:59 IST

२० हजार लांबविले, दोघांविरूद्ध गुन्हा दाखल

आॅनलाइन लोकमतशिंदखेडा (जि.धुळे) :थुंकण्याच्या कारणावरून रसवंती चालकास दोघांनी जबर मारहाण करून त्याच्या खिशातून बळजबरीन े२० हजार रुपये काढून घेतल्याची घटना मंगळवारी सकाळी दहा वाजता बसस्टॅड जवळील स्टेशन रोडवरील एम येस महाजन रसवंतीत घडली. याप्रकरणी दोघांविरूद्ध मारहाणसह लुटीचा गुन्हा करण्यात आला.येथील स्टेशनरोड लगत सुदाम सखाराम माळी यांचे एम एस महाजन कोल्ड्रिंक्स & रसवंती दुकानं आहे. मंगळवरी सकाळी १० वाजेच्या सुमारास संशयित आरोपी आकाश सोनवणे (नाट्या) रा. सिद्धार्थ नगर शिंदखेडा व पाटण येथील महादेव भिलाटी येथे राहणारा अनिल जगन पिंपळे हे दोघं आले.ते रसवंतीसमोर थुंकत असतांना येथे थूंकू नका ग्राहकांना त्रास होतो असे माळी यांनी आकाश सोनवणेला सांगितले. याचा राग येवून सुदाम माळी व त्याच्या मुलालाही सोनवणेनी वाईट वाईट शिवीगाळ करून दुकानासमोर गोधळ घातला. या वेळी आजूबाजूच्या नागरिकांनी आरोपीस समजूत घातली मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने फोन लावून त्याचा मित्र अनिल पिंपळे, यास बोलवून घेतले. त्यानेही रसवंतीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर दोघांनी रसवंती चालकास लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यापैकी एकाने फायटरने डोक्याला मारल्याने, माळी जखमी झाले.त्यांच्या डोक्याला चार टाके पडले. आकाश व अनिल या दोघांनी माळी यांच्या खिशातून २० हजार रुपए बळजबरीने काढून घेऊन तेथून पसार झाले. याबाबत सुदाम माळी यांनी शिंदखेडा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली.त्यावरून वरील आरोपी विरुद्ध मारहाणीसह जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Dhuleधुळे