दरवर्षी ११ सप्टेंबर हा दिवस विश्व प्राथमिक चिकित्सा दिवस म्हणजेच वर्ल्ड फर्स्ट एड डे म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिवस साजरा करण्याची सुरुवात इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रेड क्रॉस अँड रेट सोसायटीने २००० मध्ये केली होती. जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्राथमिक चिकित्सेचे महत्त्व व जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. कारण बऱ्याचदा रस्त्यावरचे अपघात, विविध ठिकाणी आग लागणे व अनेक अशा दुर्घटना ज्यांच्यामुळे अनेक लोक गंभीर जखमी होतात. अशा लोकांपर्यंत लवकरात लवकर प्राथमिक उपचार व योग्य उपचार मिळावेत हा यामागचा उद्देश आहे.
या दिवसाचे औचित्य साधून शाळेत यावेळी शहरातील नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकाने प्रात्यक्षिकाचे आयोजन केले होते. अग्निशमन दल वाहनप्रमुख जयवंत माळी, सुभाष पावरा, जुनेद शेख यांनी अग्निशमन दलातर्फे शाळेत येऊन आग विझवीण्याचे प्रात्यक्षिक दाखविले, तसेच विद्यार्थ्यांना आगीपासून बचाव कसा करावा, एखाद्या दुर्घटनेत योग्य मदत कशी करावी याबद्दल सखोल माहिती व मार्गदर्शन केले. यासाठी नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी संजीव हसवाणी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. याप्रसंगी शाळेतील समन्वयक अमोल सावळे, सागर वाघ, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या उपक्रमाबद्दल किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष तथा धुळे जि.प.चे अध्यक्ष डॉ़. तुषार रंधे यांनी आयोजनाबद्दल कौतुक केले.
फोटो- मेलवर/फाईल पहाणे