शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

रमाई घरकुल योजनेची कासवाच्या गतीने वाटचाल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 22:16 IST

३१ टक्के घरकुल पूर्णत्वास: धुळे तालुका अव्वल : आठशे लाभार्थ्यांना मिळाले हक्कांचे घर

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : ग्रामीण भागातील दलित वस्त्यांचा कायापालट करून त्याला नवे रूप देण्यासाठी शासनाने रमाई आवास योजनेंतर्गत नाविन्यपूर्ण घरकुल योजने सुरू केली आहे़ मात्र या योजनेची वाटचाल कासव गतीने होत असल्याने आतापर्यत तीन वर्षात  ८७९ लाभार्थ्यांना हक्कांचे घरकुल मिळाले आहे़    राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्यावतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी सुरु करण्यात आलेली रमाई आवास योजना राबविण्यात येत आहे़ या योजनेसाठी जिल्ह्यास ३ हजार ४९ घरकुलाचे उद्दिष्टे प्रशासनाकडून देण्यात आले होते़  त्यापैकी ३ हजार ३० घरकुलांना प्रत्येक्ष मंजुरी मिळाली होती़ लाभार्थ्यांना  पहिल्या हफ्त्यात धनादेश वितरित करण्यात आल्यानंतर कामांना सुरवात झाली होती़रमाई आवास योजनेच्या स्थिती अशीधुळे तालुक्यासाठी १ हजार ५५ उदिष्ठे देण्यात आले होते़ त्यापैकी १ हजार २४७ घरकुलांना मंजुरी, ३७८ घरकुल पूर्ण झाली आहेत़ त्यापैकी अद्यापक ८६९ घरकुल अपुर्ण आहेत़ साक्री ५४४ घरकुल मंजुरी, १३३ पुर्ण, ४११ अपुर्ण घरकुल, शिंदखेडा तालुका ६६३ मंजुरी १७६ पुर्ण, ४८४ अपुर्ण, शिरपूर तालुक्यात ५७६ मंजुरी, १९२ पुुर्ण, ३८४ अपुर्ण घरकुल आहेत़ दरम्यान जिल्ह्यात ३ हजार ४९ घरकुलापैकी प्रत्येक्षात ८७९ घरकुलांचे काम पुर्ण आहेत़ तर अद्याप २ हजार १५१ घरकुलांचे काम रखडले आहे़ यापूर्वी योजनेचे उद्दिष्टच कमी असल्याने अनुसूचित जातीचे लोक लाभापासून वंचित राहायचे. हक्काचे घर मिळावे, यासाठी जिल्ह्यात बहुतांश नागरिक शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत होते़ मात्र सध्या दलित वस्त्यामधील अनुसूचित जातीच्या लोकांना हक्कांचे घर मिळण्याचा मार्ग सुलभ झाला असतांना देखील हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने ही योजना कासव गतीने दिसून येत आहे़ योजनेसाठी  लागणारी कागदपत्रेरमाई घरकूल योजनेसाठी ११ प्रकारच्या कागदपत्रांची आवश्यकता आहे. यात महापालिका बीपीएल प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, टॅक्स पावती, असिसमेंट पावती, १०० रुपयांचे मुद्रांक, मतदान कार्ड, बॅकेचे पासबूक, महापालिका रहिवासी दाखला, नगरसेवकाचा दाखला, शिधापत्रिका यांचा समावेश आहे. लाभार्थ्याना लाभ घेण्यासाठी आता सरकारी उबंरठे फिरण्याची जास्त गरज भासत नाही़अनुदान वाढविण्याची गरज....केंद्र व राज्य सरकार कडून घरकुल योजनेसाठी दिली जाणारी मदतीत लाभार्थ्यांला  घरकुल पुर्ण करण्यासाठी बारकाई करावी लागते़ घरकुल पुर्ण झाली़ परिणामी आजही अनेक घरे प्लास्टर विना आहेत. बहुतांश घरे फरशी, रंग न देताच वापरात आहेत. कित्येक घरकुलांमध्ये अद्यापही विजजोडणी नाही. अनेक घरात गॅस कनेक्शन अभावी चूलीचा धूरच दिसतो आहे. या सर्व बाबींचा सखोल अभ्यास करून आवास योजनेत अनुदानित रक्कम वाढवून नव्याने बदल करण्याची गरज सरकारला आहे.

टॅग्स :Dhuleधुळे