लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : सन २०१९ -२०२० या आर्थिक वर्षात वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये अनुसूचित जातीच्या ५० आणि अनुसूचित जमातीच्या सहा अशा एकूण ५६ शेतकऱ्यांना विहिरी मंजुर झाल्याची माहिती पंचायत समितीचे विशेष घटक योजनेचे कृषी अधिकारी डॉ़ तुषार तिवारी यांनी दिली़अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या शेतकºयांच्या कल्याणासाठी शासनामार्फत डॉ़ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना या दोन योजना राबिल्या जातात़ योजनांची अंमलबजावणी करणारी यंत्रणा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा कृषी विभाग आहे़ या योजनेसाठी दरवर्षी आॅनलाईन पध्दतीने अर्ज मागविले जातात़ अर्जांची संख्या अधिक असल्यास इन कॅमेरा लॉटरी पध्दतीने शेतकºयांना विहिरी मंजूर केल्या जातात़ जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निवड समितीचे अध्यक्ष आहेत़ त्यांच्या उपस्थितीत शेतकºयांच्या समोर लॉटरी काढली जाते़ या योजनांमध्ये लाभार्थ्यांना शंभर टक्के अनुदान दिले जाते़सन २०१९ -२०२० या आर्थिक वर्षात अनुसूचित जातीच्या १६० लाभार्थ्यांनी आॅनलाईन अर्ज केले होते़ त्यापैकी १०७ अर्ज पात्र ठरले़ लॉटरी पध्दतीने ५० लाभार्थ्यांची निवड झाली़अनुसूचित जमातीच्या ९७ शेतकºयांनी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेत आॅनलाईन अर्ज केले होते़ त्यापैकी ४७ अर्ज पात्र ठरले़ लॉटरी पध्दतीने सहा लाभार्थ्यांना विहिर मंजूर झाली़दोन्ही योजनेतील लाभार्थ्यांना नोव्हेंबर २०१९ मध्ये कार्यारंभ आदेश देण्यात आले असून विहिरींची कामे प्रगतीपथावर आहेत़ यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे जमीनीची पाण्याची पातळी वाढली आहे़ त्यामुळे विहिरींचे काम संथ गतीने सुरू आहे़डॉ़ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती या दोन्ही योजनांमध्ये समान आर्थिक लाभ दिला जातो़ नवीन विहिरीसाठी २ लाख ५० हजार रुपये, जुनी विहिर दुरूस्तीसाठी ५० हजार, इन वेल बोअरींगसाठी २० हजार, पंप संचासाठी २० हजार, शेततळे प्लास्टीक अस्तरीकरणासाठी १ लाख रुपये, सूक्ष्म सिंचन संचात ठिबक किंवा तुषार सिंचनासाठी ५० हजार रुपये असे लाभाचे स्वरुप आहे़ या योजनांमध्ये विहीरीचे काम पूर्ण करण्यासाठी दोन वर्षांची मुदत असते़ दोन वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या विहिरींची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत़ विहिरींचे खोदकाम पूर्ण झाले आहे़ सुदैवाने पाऊस चांगला झाल्यामुळे जमिनीची पाण्याची पातळी वाढली आणि विहीरी तुडूंब भरल्या़ त्यामुळे विहिरींचे बांधकाम रखडले आहे़ पाणी पातळी खाली झाल्यावरच बांधकामाला वाव मिळणार आहे़ परंतु मुदत संपली तर मंजूर निधी परत जाण्याची शक्यता आहे़ तसे होवू नये यासाठी विहिरींच्या बांधकामाला मुदतवाढ द्यावी अशी मागणी शेतकºयांकडून करण्यात येत आहे़ मुदतवाढीसाठी प्रशासकीय पातळीवरुन हालचाली सुरू आहेत़चालु आर्थिक वर्षात विहिरी मंजूर झालेल्या ५६ शेतकºयांना विहिरींचे काम मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना यंत्रणेने दिल्या आहेत़ परंतु काही फुटांवरच पाणी लागत असल्याने खोदकाम नाईलाजास्तव थांबवावे लागत आहे़ विहीर खोदकामासाठी ५० फुटाची मर्यादा असते, असे एका शेतकºयाने सांगितले़
५६ शेतकऱ्यांना विहिरी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 23:05 IST