आॅनलाइन लोकमतधुळे : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी हे प्रश्न सोडविण्यासाठी वेळ देत नाही, अशी तक्रार जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीने केली असून, आमचे प्रश्न सोडविण्यासाठी वेळ द्यावी, अशी मागणी संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे आज केली.जिल्हा प्राथमिक शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांना अनेकदा भेटण्याचा प्रयत्न केला, मात्र ते भेटतच नाही. माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातही त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र ते भेटू शकलेले नाही. शिक्षणाधिकारीच भेटत नसल्याने, शिक्षकांचे प्रश्नही मार्गी लागत नाही, असे जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील यांचे म्हणणे आहे.त्यामुळे शिक्षकांचे प्रश्न सुटावे यासाठी त्यांनी गुरूवारी मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन देवराजन यांनाच एक निवेदन देवून शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी तारीख व वेळ द्यावी अशी मागणी केली.प्रलंबित प्रश्नांमध्ये जिल्हा परिषद शाळांचे लाईटबील १४ व्या वित्त आयोगातून भरण्यात यावे, वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी प्रस्ताव मंजूर करावे, १ जानेवारी २०१६ पासून लागू करण्यात आलेल्या सातव्या वेतन आयोगाची निश्चिती करतांना त्रृटीची दुरूस्ती करावी, आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांची सेवाज्येष्ठता शासन निर्णयानुसार घेण्यात यावी, शिक्षकांचे मासिक वेतन महिन्याच्या एक तारखेलाच करावे, वैद्यकीय बिल वेळेवर मिळावे आदी मागण्यांचा समावेश आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील, सरचिटणीस बापू पारधी यांची स्वाक्षरी आहे.
धुळे जिल्हयातील प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 13:25 IST
जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीची सीईओंकडे मागणी
धुळे जिल्हयातील प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावावेत
ठळक मुद्देजिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबितप्राथमिक शिक्षणाधिकारी भेटत नसल्याची तक्ररसमस्या मार्गी लावण्याची मागणी