शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात दरोडा टाकण्यापुर्वीच शस्त्रांसह चौघे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 17:25 IST

मोहाडी पोलीस : फरार आरोपीचा शोध सुरु

ठळक मुद्देमोहाडी पोलिसांची कामगिरीचौघांना केले जेरबंद, एक फरारकार आणि शस्त्रास्त्र केले जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मोहाडी पोलिसांच्या गस्ती पथकाने म्हाडा वस्तीजवळ कार आणि शस्त्रांस्त्रासह चौघा दरोडेखोरांना रविवारी पहाटेच जेरबंद केले़ एक जण मात्र अंधाराचा फायदा घेवून पळून जाण्यात यशस्वी ठरला़ दरोडेखोर जेरबंद झाले नसते तर मोठी दुर्घटना घडली असती, असा अंदाज व्यक्त होत आहे़ पोलिसांची रात्रीची गस्तमुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर म्हाडा वसाहत परिसरात मोहाडी पोलिसांची रात्रीची गस्त सुरु होती़ या वसाहतीजवळील पंचमुखी हनुमान मंदिराजवळ एक संशयास्पदरित्या कार आणि त्यात काही जण असल्याची गोपनीय माहिती मोहाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना मिळाली़ माहिती मिळताच त्यांच्या नेतृत्वाखाली मोहाडी पोलिसांचे पथक पंचमुखी हनुमान मंदिराजवळ पोहचले़ कारजवळ आल्यानंतर प्राथमिक चौकशी करत असताना कारची तपासणीही करण्यात आली़ त्यात तलवार, लाकडी दांडा, सुती दोरी, मिरचीची पूड, लोखंडी रॉड, पाईप, लोखंडी पाना असे साहित्य आढळून आले़ चौघांना केली अटकपोलिसांनी लागलीच कारमध्ये असलेले विरेंद्रसिंग रामकेवलसिंग ठाकूर (३५, रा़ पुरेजित ता़ हातगवा जि़ प्रतापगढ), गोकूळ लिंबाजी घाडगे (३२, रा़ गोरेगाव, मुंबई), संजय बाळू कामडी (२८, रा़ वसई जि़ पालघर), कैलास चिंतामण मोरे (२६, रा़ सोनगीर ता़ धुळे) या चौघा संशयितांना जेरबंद केले़ अंधाराचा फायदा घेवून एक संशयित मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरला़कारसह मुद्देमाल जप्तपोलिसांनी एमएच ०४ एफए ५८३९ क्रमांकाची कार आणि दरोड्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य असे एकूण ५ लाख २२ हजार ४१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे़ पोलिसात गुन्ह्याची नोंदमोहाडी पोलिसांनी रविवारी पहाटे साडेबारा वाजेच्या सुमारास ही कारवाई केली़ याप्रकरणी चौघांना जेरबंद करण्यात आले़ याप्रकरणी रविवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास हेड कॉन्स्टेबल भिकाजी रामचंद्र पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन चौघाही संशयित दरोडेखोरांविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला़ यातील एक जण फरार झाला असल्याने पोलीस त्याच्या मागावर आहेत़ 

टॅग्स :DhuleधुळेCrimeगुन्हा