धुळे : शहराकडून अजंग गावाच्या दिशेने जाणाऱ्या थ्री सीटर रिक्षाला ट्रकने मागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात रिक्षा चालकाचा जागीज मृत्यू झाला. तर तीन प्रवासी भाजल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. बुधवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.फागणे गावाच्या पुढे कासुमाई नर्सरी जवळ हा अपघात घडला. ट्रकने मागच्या बाजूने धडक दिल्याने रिक्षाला आग लागल्याने रिक्षाचालकाचा जागीच जळून मृत्य झाला. रात्री उशिरापर्यंत त्याची ओळख पटलेली नव्हती. तर याच रिक्षातून प्रवास करणारे आनंद शिवराम भदाणे (४२), प्रमिलाबाई भिमराव भदाणे (५६) व वैशाली श्रावण माळी (२२) सर्व रा. अजंग तालुका धुळे हे तिघे भाजून गंभीर जखमी झाले. शिवाय त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. प्रदिप माळी यांनी तिघांना वाहनाने भाऊसाहेब हिरे शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.
ट्रकची रिक्षाला फागणेनजीक धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 22:28 IST