शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
3
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
4
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
5
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
6
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
7
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
8
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
9
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
10
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
11
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
12
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
13
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
14
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
15
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
16
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
17
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
18
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
19
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
20
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी

मारण्याच्या उद्देशाने पतीने मला व मुलीस पेटवले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 13:24 IST

पत्नी सरिता खैरनार हीचा जबाब : अमळनेरच्या घटनेतील जखमी दोघांवर धुळ्यात  उपचार 

ठळक मुद्देघटनेतील मयत अनिल खैरनार साक्री तालुक्यातील दुसानेचा मूळ रहिवासी पत्नी सरिता, मुलगी तनुजा यांच्यावर धुळ्यात खाजगी दवाखान्यात उपचार पतीने मारण्याच्या उद्देशाने मला व मुलीस पेट्रोल टाकून पेटविले, पत्नीचा जबाब

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे :  लोकमत न्यूज नेटवर्कधुळे :  अमळनेर येथील घटनेत गंभीररीत्या भाजलेल्या सरिता खैरनार (३२) व त्यांची मुलगी तनुजा (५) यांच्यावर येथील खाजगी दवाखान्यात उपचार करण्यात येत आहेत. येथील शहर पोलिसांनी सरिता खैरनार यांचा जबाब घेतला. त्यात पती अनिल खैरनार याने आम्हाला मारण्याच्या उद्देशाने माझ्या व मुलीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. तत्पूर्वी माझ्या गळ्यावर चाकूने वार केले, असे सांगितले. अमळनेर येथील प्रताप मिल कम्पाऊंडमधील रहिवासी निवृत्त सैनिक अनिल खैरनार याने बुधवारी पहाटे पत्नी व मुलीस पेट्रोल टाकून पेटवून दिल्याने त्यात पत्नी सरिता (३२) व मुलगी तनुजा (५) या दोघी भाजल्याने गंभीररीत्या जखमी झाल्या. त्यांच्यावर येथील जिल्हा रूग्णालयात प्राथमिक उपचार करून साक्रीरोडवरील सेवा या खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात येत आहेत. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांनी सकाळी अनिल खैरनार सैन्यात होते. सहा महिन्यांपूर्वी ते निवृत्त झाले. त्यावेळी मिळालेल्या पैशांतून त्यांने घराचे बांधकाम केले. यात सर्व पैसे संपल्याने ते तणावात आले. त्यामुळे त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला होता, असे त्यांच्या बोलण्यातून जाणवायचे. मी मेल्यानंतर तुमचे कसे होईल, असे ते म्हणत. बुधवारी रात्री अनिल मुलगा करणसह कॉटवर तर पत्नी सरिता मुलगी तनुजासह खाली झोपली होती. पहाटे साडेचार वाजता अनिल खैरनार यांनी चाकूने पत्नीच्या गळ्यावर वार केला. तसेच त्यांच्या अंगावर तसेच कॉटवर पेट्रोल ओतून लाईटरच्या सहाय्याने पेटवून दिले. सरिताने दार उघडून बाहेर पळाली. तिने बाहेर मातीत लोळून स्वत:ला विझविण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर अनिलने तेथून पळ काढला. घरात मुलगी तनुजा ८५ ते ९० टक्के भाजली. अनिलने रेल्वे मार्गावर जाऊन मालगाडी स्वत:ला झोकून देत आत्महत्या केली. जखमी सरिता खैरनार व मुलगी तनुजा यांना तातडीने येथील जिल्हा रूग्णालयात आणण्यात आले. त्यांच्यावर उपचार करून पुढील उपचारासाठी खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असून दोघांची प्र्रकृती गंभीर असल्याची माहिती या दावाखान्याच्या डॉक्टरांनी दिली. कुटुंबीय अनभिज्ञ मयत अनिल खैरनार हे दोन वर्षांपूर्वी सैन्यातून सेवानिवृत्त झाले. ते १० वर्षांपासून अमळनेरला राहत होते. दुसाने येथे त्यांचे वडील लोटन हरी खैरनार, आई बेबाबाई, लहान भाऊ रावसाहेब राहतात. लहान भावाचे लग्न झाले असून तो शेती करतो. मयत अनिलचे शिक्षण दुसाने येथे झाले आहे. तो शांत स्वभावाचा होता,असे त्यांच्या मित्रांचे म्हणणे आहे. दुसाने येथे अद्याप या दुदेर्वी घटनेची माहिती त्यांच्या घरी कळविले नसल्याने ते या घटनेपासून आतापर्यंत अनभिज्ञ असल्याचे आमच्या दुसाने येथील वार्ताहराने कळविले. मयत खैरनार यांचे आजोबा हरी खैरनार हे स्वातंत्र्यसैनिक होते. आजी सोजाबाई हरी खैरनार या हयात आहेत. 

 

टॅग्स :DhuleधुळेCrimeगुन्हा