शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

साडेतीन लाख क्विंटल कापूस खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 23:02 IST

दोंडाईचा सीसीआय केंद्र : कापसाचे १७५ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या नावावर जमा

लोकमत न्यूज नेटवर्कदोंडाईचा : शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत सीसीआयने यावर्षी तीन केंद्रावर ३ लाख २८ हजार २२८ क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. सीसीआयने कापसाच्या रक्कमेपोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर १७५ कोटी रुपये जमा केल्याची माहिती सीसीआयचे आदित्य वामन यांनी दिली आहे.खाजगी व्यापाºयांमार्फत शेतकºयांना कापसाला जादा भाव मिळत नव्हता. शेतकºयांच्या कापसाला योग्य भाव मिळावा म्हणून आमदार जयकुमार रावल यांनी भारतीय कपास निगमकडे तात्काळ कापूस खरेदीची मागणी केली होती. सीसीआयने २० नोव्हेंबर २०१९ ते २१ मार्च दरम्यान कापूस खरेदी केली. महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने २२ मार्चपासून दोंडाईचा येथे कापूस खरेदी बंद झाली. शेतकºयांच्या मजबुरीचा गैरफायदा परिसरातील काही खाजगी व्यापाºयांनी घेतला व शेतकºयांकडून कमी दराने कापूस खरेदी केला.शेतकºयांचा घरात हजारो क्विंटल कापूस मोजणीविना पडला होता. याची दखल पुन्हा आमदार जयकुमार रावल यांनी घेऊन भारतीय कपास निगमला कापूस खरेदी करण्याची मागणी केली. त्यानुसार पुन्हा दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून ४ मे २०२० पासून सीसीआयने कापूस खरेदी सुरू केली होती. दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील यांनी याकामी मेहनत घेऊन कापूस मोजणेकामी विशेष लक्ष दिले. दोंडाईचा येथील अभिषेक जिनिंग, बाम्हणे येथील केशरानंद जिनिंग, शिंदखेडा येथील वर्धमान जिनिंग या तिन्ही ठिकाणी कापूस खरेदी झाली आहे. सीसीआयने कापूस खरेदी करावा, यासाठी सुमारे ६ हजार ४०० शेतकºयांनी नोंदणी केली होती.१० जूनपावेतो २ लाख ६० हजार क्विंटल कापूस व ५४ हजार कापसाच्या गाठी तयार होत्या. तर १८ जूनपावेतो २ लाख ७२ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली व ५६ हजार गाठी तयार होत्या. ८ जुलैपर्यंत २ लाख ९२ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली होती. तर सुमारे १५८ कोटी रुपये कापसाचे वाटप झाले होते. तर कापसाच्या गाठी सुमारे ६१ हजार होत्या. सरकीची लवकरच विक्री होणार आहे. दरम्यान, काही खरेदी केंद्रांवर छत नसल्याने कापूस व गाठी, सरकी ओली झाल्याची तक्रार आहे.आमदार जयकुमार रावल हे सीसीआयने तालुक्यातील संपूर्ण कापसाची खरेदी करावी, यासाठी प्रयत्नशील होते. ते स्वत: याकामी लक्ष ठेऊन होते. याकामी सीसीआयचे आदित्य वामन, दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समिती चेअरमन नारायण पाटील, सचिव पंडित पाटील आदींनी प्रयत्न केले.यावर्षी सीसीआय मार्फत ३ लाख २८ हजार २७८ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली असून १७५ कोटी रुपये शेतकºयांच्या नावावर अदा करण्यात आले आहे. तर कापसाच्या गाठी ६८ हजार २८२ असल्याची माहिती सीसीआयचे आदित्य वामन यांनी दिली.