शहरात विविध दुकानदार, जाहिरातदार, टीव्ही शोरूम, मोबाईल शोरूम, जेन्टस व लेडीज गारमेंटस दुकानदारांसह हाॅटेल व्यावसायिकांनी आपल्या दुकानांवर मोठमोठे बॅनर, वाढदिवस व इतर बॅनर लावलेले आहेत. त्यासाठी महापालिका जाहिरात विभागाची कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे कराच्या माध्यमातून महापालिकेला येणारे उत्पन्न मोठ्या प्रमाणात बुडत आहे. तसेच बॅनरमुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. तरी अनधिकृत बॅनर लावलेल्या व्यक्तींनी तातडीने परवानगी घेऊन कराचा भरणा करावा, अन्यथा अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांवर महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम २४४ व २४५ व महाराष्ट्र महापालिका व जाहिरात प्रदर्शित करण्याचे नियमन व नियंत्रण नियम २०१४ अन्वये काढण्याची कारवाई करण्यात येईल असा असा इशारा महापालिका आयुक्त अजिज शेख यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिला आहे.
फोटो छापवाल्यांवर आता दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:45 IST