Provide financial assistance to the victims of the storm to farmers | वादळातील नुकसानग्रस्तांना शेतकºयांना आर्थिक मदत द्या
तालुक्यातील ग्रामस्थांना नुकसान भरपाई मिळावी याबाबत जिल्हाधिकाºयांशी संवाद साधताना कुणाल पाटील़ 

धुळे : वादळी पावसामुळे धुळे तालुक्यात झालेल्या नुकसानीची भरपाई प्रशासनाने द्यावी अशी मागणी आमदार कुणाल पाटील आणि शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे बुधवारी केली़ त्यांना निवेदन देखील सादर केले़ 
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे सभापती मधुकर गर्दे, डॉ़ दरबारसिंग गिरासे, गुलाबराव कोतेकर, बाजीराव पाटील, बळीराम राठोड, बापू खैरनार, राजीव पाटील, विकास पाटील, किरण पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते़ 
जिल्हाधिकारी यांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे, की धुळे तालुक्यातील ११ जून रोजी सायंकाळी अचानक वादळी वाºयासह पाऊस झाला़ वादळामुळे शेतकºयांच्या कांदा चाळीचे नुकसान झाले़ यात लाखों रुपयांचा फटका शेतकºयांना सहन करावा लागणार आहे़ गावातील रहिवाश्यांच्या घराचे पत्रे उडाले़ काहींच्या घरावर वादळामुळे उन्मळून पडलेली झाडे कोसळल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत़ 
धुळे तालुक्यातील शिरुड, कापडणे, नेर, कुसुंबा, मुकटी या परिसरातील शेतकºयांचे पॉली हाऊस जमीनदोस्त झाल्या़ बोरकुंडसह परिसरातील शेतकºयांच्या पोल्ट्री फार्मचे वादळामुळे पत्रे उडाली़ त्यात नुकसान झाले आहे़ नुकसानग्रस्तांना भरपाई विनाविलंब मिळावी अशीही मागणी यावेळी करण्यात आली़ 
ग्रामस्थांचेही अतोनात नुकसान 
*धुळे तालुक्यातील तिसगाव परिसरात मंगळवारी दुपारी अचानक जोरदार वादळ सुरु झाल्याने सर्वांचीच त्रेधा उडाली़ वादळामुळे शेतातील ठिंबक सिंचनाच्या नळ्या हवेत उडून गेल्या़ शेतकºयांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले़ 
*नेर शिवारात वादळामुळे समर्थ कॉलनी, संत गोरा कुंभार पिठाची गिरणीच्या अंगणात वादळामुळे विजेची तार कोसळली़ याठिकाणी प्रचंड नुकसान झाले आहे़ 
*बाभुळवाडी येथील बाभुळवाडी येथे राहणारे विकास पितांबर देवरे व वामन राजधर पाटील हे दोन कुटुंब मजुरी करून आपला उद्ररनिर्वाह करतात़ मंगळवारी झालेळ्या वादळामुळे त्यांच्या घराच्या छताचे पत्रे उडाले़ यामुळे मोठे नुकसान झाले आहे . त्यांना घरात राहणे मुश्कील झाले आहे़ 


Web Title: Provide financial assistance to the victims of the storm to farmers
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.