धुळे : मुंबई येथील राजगृहावर झालेल्या हल्ल्याचा दलित सेनाने निषेध केला आहे़ तोडफोड करणाऱ्या समाजकंटकाला त्वरीत अटक करावी, पडद्यामागील सूत्रधारांचा शोध घ्यावा, मुंबई येथील सिडको परिसरातील बौध्द लेण्या तोडण्याचे काम थांबवावे आदी मागण्या करण्यात आहेत़ जिल्हाध्यक्ष वसंत मोरे, अॅड़ नामदेव मोरे, सचिन नेरकर, प्रकाश झनके, अश्विन मोरे, किरण मोरे, सुनिता सोनार यांच्यासह कार्यकर्त्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने केली़
राजगृहावर हल्ला प्रकरणी निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 21:35 IST