१५१ मुलींच्या मोफत सायकलींचे प्रस्ताव मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 11:25 AM2019-11-23T11:25:03+5:302019-11-23T11:26:10+5:30

तालुक्यातील २१ माध्यमिक विद्यालयांचा समावेश : तीन हजार ५०० रुपये प्रत्येक विद्यार्थिनीच्या खात्यावर

 Proposal for free 3 girls bicycles approved | १५१ मुलींच्या मोफत सायकलींचे प्रस्ताव मंजूर

Dhule

Next

धमनार : अतिमागास १२५ तालुक्यांमध्ये इयत्ता आठवी इयत्ता बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या आणि शाळे पासून तीन किलोमीटर अंतरापर्यंत राहणाऱ्या गरजू मुलांना सायकल वाटप करण्याची योजना 'राज्य मानव विकास मिशन’ मार्फत राबवली जात आहे. या योजनेंतर्गत तालुक्यातून १५१ मुलींचे प्रस्ताव मंजूर झाले असून तालुक्यातून २१ माध्यमिक विद्यालयातील मुलींसाठी ३५०० रुपयाप्रमाणे निधी संबंधित मुलींच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे.
या योजनेतून लोकांसमोर असलेल्या विविध पयार्यांचा विकास करून क्षमता वाढवणे, त्यासाठी साधन सामग्री देणे व न्याय हक्काचे रक्षण करणे, त्यांच्या पर्यंत पोहचण्याचा वाटा विकसित करणे या गोष्टींना प्राधान्य दिले जात आहे. त्यातील एक भाग म्हणून ग्रामीण भागातील गरजू मुलांना सायकल वाटप करण्याची योजना राबविली जात आहे.
या योजनेत स्वत: सायकल खरेदी न करता त्याची रक्कम लाभार्थी मुलींच्या खात्यात थेट जमा करते. त्यासाठी सायकल खरेदीपूर्वी दोन हजार रुपयांचा धनादेश शाळा व्यवस्थापन समिती यांच्या खात्यात जमा केला जातो. नंतर मुख्याध्यपक आरटीजीएस करून संबंधित लाभार्थी सायकल खरेदी पूर्वी दोन हजार रुपयांची रक्कम मुलीच्या बँक खात्यात टाकली जाते.
सायकल खरेदी केल्यानंतर टेक्सपेअर आयडेंटिफिकेशन नंबर (टी आय एन क्रमांक) असलेले पावती संबंधित शाळा व्यवस्थापन व विकास समितीकडे सादर केल्यानंतर उर्वरित एक हजार पाचशे रुपयांचा निधी पुन्हा संबंधित मुलीच्या खात्यावर जमा होतो. म्हणजेच योजनेतून सायकल खरेदीसाठी प्रत्येक मुलीला तीन हजार पाचशे रुपये निधी मिळतो.
या योजनेची अंमलबजावणी शिक्षणाधिकरी जिल्हा परिषद यांच्या मार्फत होते. साक्री तालुक्यातील या शैक्षणिक वर्षी म्हसदी कन्या ३०, दिघावे १२, कासारे ५, धनेर ८ , बेहेड ४, दातर्ती ५, छाईल १२, म्हसदी ०९, कुरुसवाडे ०३, पिंपळगाव ०४, वासखेडी ०६, पिंजारझाडी ०५, नागपूर (व)०३, साक्री कन्या ०९, दहीवेल १२, आ. मा.साक्री १३, हट्टी ०४, ककाणी ०४, किरवाडे ०२, उंबर्टी ०१ या प्रमाणे मोफत सायकल वाटप योजनेतून १५१ मुलींचे प्रस्ताव मंजूर झाले असून २१ माध्यमिक विद्यालयातील मुलींसाठी ३५०० रुपयाप्रमाणे निधी संबंधित मुलींच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे .
यावेळी प्रथम २००० रुपये व सायकल खरेदी केल्यानंतर एक हजार पाचशे रुपये जमा होतील. त्यासाठी टी आय एन क्रमांक खरेदीची पावती असणे आवश्यक आहे. या योजनेतून मोफत सायकल वाटप ,अभयसिका वर्ग, मोफत एसटी पास तालुका विज्ञान भवन भेट हे लाभ शिक्षण विभागाला दिले जातात असे साक्री तालुका पंचायत समिती शिक्षण विस्तार अधिकारी सी.एस. अहिरे यांनी सांगितले.
यावेळी दातर्ती येथील ज्ञान प्रबोधिनी माध्यमिक विद्यालयात मोफत सायकल वाटप करताना शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती सी.एन. अहिरे., मुख्याध्यपिका एस.पी. गायकवाड, शिक्षक, कर्मचारी आणि लाभार्थी उपस्थित होते.

Web Title:  Proposal for free 3 girls bicycles approved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे