धुळे : येथील जिल्हा कारागृहातील दहा कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाली असून, त्यापैकी २ कर्मचारी सुभेदार, तर ८ कर्मचाऱ्यांना हवालदारपदी बढती मिळाली आहे. पदोन्नतीवर त्यांच्या विविध ठिकाणी बदल्या झाल्या आहेत. तत्पूर्वी जिल्हा कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांच्या हस्ते त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.
धुळे जिल्हा कारागृहातील दिलीप खंडू पवार यांना नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह, तर जनार्दन गोपाळ बोरसे यांना नंदुरबार जिल्हा कारागृहात सुभेदार म्हणून पदोन्नतीवर पाठविण्यात आले आहे. हवालदारपदी पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आणि कंसात नियुक्तीचे ठिकाण असे : अंबादास गणपत बोरोड (नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह), सुरेश सुकदेव निवारे (जळगाव जिल्हा कारागृह), दत्तात्रय दादू गायकवाड (नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह), किरण दत्तात्रय पाटील (नंदुरबार जिल्हा कारागृह), शिवाजी सदाशिव कासोदे (जळगाव जिल्हा कारागृह), भरत काशीनाथ करपे (नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह), रमेश वामन हांडे (जळगाव जिल्हा कारागृह), अनिल श्रीराम
बडगुजन (पैठण खुले जिल्हा कारागृह).
पदोन्नती मिळाल्याबद्दल या कर्मचाऱ्यांचे गृहविभागात काैतुक होत आहे.