शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक कार्याचा वसा जोपासणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 12:50 IST

कुटूंबियांच्या भावना : राजकीय पार्श्वभूमी नसतांना मिळाले उपमहापौरपद

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीतून वाटचाल करत आज महापालिकेचे एक उच्च पद कुटूंबाला मिळाले याचा आनंद व अभिमान आहे़ पण पद मिळाले तरी सामाजिक कार्याचा वसा कायम ठेवू, अशा भावना उपमहापौर कल्याणी अंपळकर यांच्या कुटूंबियांनी व्यक्त केल्या़यंदाच्या महापालिका निवडणूकीत निवडून येत कल्याणी अंपळकर यांच्या माध्यमातून अंपळकर कुटूंबाचा प्रथमच राजकारणात प्रवेश होत आहे़ राजकीय पार्श्वभूमी नसतांना मिळालेले उपमहापौर पद ही कुटूंबासाठी अभिमानाची बाब असल्याचे कुटूंबिय सांगतात़, तसेच पक्षाचे आभार मानतात़ कल्याणी अंपळकर यांच्या कुटूंबात त्यांचे पती सतिश अंपळकर, मुले सुजाता व मुलगा सुहास (कुस्तीपटू), दीर गजेंद्र अंपळकर, जाऊ अश्विनी अंपळकर, सासू भागुबाई अंपळकर यांचा समावेश आहे़ कल्याणी अंपळकर यांचे माहेर नागपूर येथील आहे़ कौटुंबिक जबाबदारी सांभाळतांनाच सामाजिक कार्याचा वसा कायम जोपासत राहणार असल्याचे कल्याणी अंपळकर सांगतात़ अंपळकर कुटूंबियांनी १९९५-९६ मध्ये डॉ़ सुभाष भामरे यांच्या मदतीने दुग्धव्यवसाय सुरू केला होता़त्यानंतर त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारत गेली़ त्यामुळे ते डॉ़ सुभाष भामरे यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात़ अंपळकर कुटूंबियांच्या सध्या तीन ठिकाणी दुध डेअरी, हॉटेल, व्यायामशाळा आहेत़ या माध्यमातून ते प्रभागात नेहमीच विकास कामे करत असतात़ उपमहापौर पद मिळाले तरी नागरिकांमध्ये मिसळत राहून त्यांच्या समस्या सोडविण्यावर भर देणार आहे़ शहर विकासात योगदान देण्याची संधी मिळाल्याने अंपळकर कुटूंबाचा उत्साह व्दिगुणित झाला आहे़माझ्या सुनेला उपमहापौर पद मिळणे ही आमच्या कुटूंबासाठी अभिमानाची बाब आहे़ आमचे कुटूंब अत्यंत कष्टातून व गरिब आर्थिक परिस्थितीतून वर आले असल्याने सामाजिक कार्याची ओढ आहे़-भागुबाई अंपळकर, उपमहापौरांच्या सासू

आमच्या कुटूंबाला भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आज महापालिकेचे उच्चपद मिळाले आहे़ या संधीचे सोने करू व शहराच्या विकासात अधिक योगदान देण्यासाठी प्रयत्नशिल राहू़-सतीश अंपळकर,उपमहापौरांचे पती

राजकीय पार्श्वभूमी नसतांना मिळालेल्या या संधीमुळे कुटूंबाला अभिमान आहे़ सामाजिक कार्यात आम्ही नेहमीच कार्यरत राहिलो असून तसेच प्रयत्न भविष्यात कायम ठेवू व विकासावर भर देऊ़-गजेंद्र अंपळकर,उपमहापौरांचे दीर

टॅग्स :Dhuleधुळे