शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात जागतिक हिवताप दिनानिमित्ताने कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 21:44 IST

रॅलीद्वारे नागरिकांचे प्रबोधन; बसस्थानकातही प्रदर्शनाचे आयोजन

ठळक मुद्देजागतिक हिवताप दिवसाचे औचित्य साधून बसस्थानकात मनपाच्यावतीने प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रवाशांना प्रबोधनात्मक पत्रकांचे वाटप करण्यात आले. तसेच दूषित पाण्यात अळ्या कशा असतात? ते ही दाखविण्यात आले.हिवताप आजार टाळण्यासाठी नागरिकांनी नेमकी काय काळजी घेतली पाहिजे? याची माहितीही येथे देण्यात आली. थंडी वाजून ताप येणे, डोके, अंग दुखणे, थकवा येऊन झोप लागणे ही हिवतापाची लक्षणे आहेत. ही लक्षणे दिसून आल्यास किंवा आजारी पडल्यास तत्काळ डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा, असा सल्ला धुळे बसस्थानकात प्रवाशांना देण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : गेल्या काही वर्षात हिवतापामुळे अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. प्रशासनातर्फे हिवताप टाळण्यासाठी  जनजागृती केली जाते. मात्र, जिल्ह्यात हिवताप समूळ नष्ट कसा होईल? यादृष्टीने अधिकारी, कर्मचा-यांनीही प्रयत्नशील राहिले पाहिजे. तसेच नागरिकांनीही सजग राहून हिवतापाची लक्षणे दिसल्यास औषधोपचार घेतले पाहिजे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या आरोग्य समिती व शिक्षण सभापती नूतन पाटील यांनी येथे व्यक्त केले. जागतिक हिवताप दिवसानिमित्ताने जुन्या जिल्हा रुग्णालयात बुधवारी सकाळी कार्यक्रम झाला. या कार्यक्रमप्रसंगी त्या बोलत होत्या. मंचावर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मोहन पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी बाळासाहेब चव्हाण, डॉ. संजय शिंदे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रदीप वैष्णव, मनपाच्या जीवशास्त्रज्ञ अपर्णा पाटील, प्रभारी वैद्यकीय अधिकारी एम. आर. झुंजारराव, तालुका आरोग्य पर्यवेक्षक एस.पी.गोसावी आदी उपस्थित होते. रॅलीद्वारे जनजागृती जागतिक हिवताप दिनाच्या निमित्ताने बुधवारी मनपा व जिल्हा हिवताप कार्यालय यांच्या संयुक्तविद्यमाने जनजागृतीपर रॅली काढण्यात आली. जुन्या जिल्हा रुग्णालयापासून या रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीत सरोजनी कॉलेज आॅफ नर्सिंगच्या विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. त्यांनी ‘गप्पी मासे पाळा हिवताप टाळा’, ‘तयारी हिवताप हरविण्याची’, ‘आठवड्यातून एक दिवस तरी कोरडा पाळा’ यांसारख्या घोषणा देत नागरिकांची जनजागृती केली. रॅलीचा समारोप झाल्यानंतर जुन्या जिल्हा रुग्णालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

चार महिन्यात ४ हिवतापाचे रुग्ण जानेवारी ते एप्रिल २०१८ या चार महिन्याच्या कालावधित हिवतापाचे चार रुग्ण आढळून आल्याची माहिती जुन्या जिल्हा रुग्णालयात आयोजित कार्यक्रमात देण्यात आली. जिल्ह्यात २०१५ मध्ये २३२, २०१६ मध्ये १२७ तर २०१७ सालात ८० हिवतापाचे रुग्ण आढळून आले. हिवताप जिल्ह्यातून समूळ नष्ट करण्यासाठी प्रशासनातर्फे जनजागृती सुरू असून हा आजार टाळण्यासाठी नागरिकांनीही काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन मान्यवरांनी येथे केले. 

टॅग्स :zpजिल्हा परिषदDhuleधुळे