लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : सर्वर डाऊनमुळे धान्य वितरणात अडचणी, महिला रेशन दुकानदाराशी ग्राहकाचा वाद, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनधुळे : गेल्या आठ दिवसांपासून वेळोवेळी सर्वर डाऊन होत असल्यामुळे पीओएस यंत्रावर रेशनकार्ड धारकांचे बायोमेट्रीक थम घेण्यात आणि पर्यायाने धान्य वितरणात अडचणी येत आहेत़यासंदर्भात शिंदखेडा तालुका रेशन दुकानदार संघटनेने सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले़ निवेदनात म्हटले आहे की, सर्वर बंद असल्याने तांत्रिक अडचणींमुळे रेशन दुकानदार तसेच ग्राहकांमध्ये वादाची ठिणगी पडत आहे़ दोंडाईचा येथे महिला रेशन दुकानदार सविता वाडीले यांनी सर्वर बंद असल्यामुळे नंतर धान्य देते असे सांगितल्याचा राग आल्याने राजेंद्र कोळी या रेशनकार्ड धारकाने महिला दुकानदारास शिवीगाळ करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिली़ हा वाद पोलिस ठाण्यापर्यंत गेला़ संघटनेच्या पदाधिकाºयांनी मध्यस्ती केल्यानंतर सामंजस्याने वाद मिटला़पीओएस कंपनीच्या यंत्रणेमुळे या अडचणी येत आहेत़ रेशन दुकानदारांना मनस्ताप सहन करावा लागत आहे़पीओएस मशीनला अडचणी येणार नाहीत याची दक्षता घ्यावी, रेशन दुकानदारांच्या सुरक्षेसाठी कायदा करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे़ निवेदनावर स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष आऱ आऱ पाटील, सचिव सुरेश कुंभार, उपाध्यक्ष तुषार पाटील यांच्यासह रेशन दुकानदारांच्या सह्या आहेत़
बायोमेट्रीकचे सर्वर डाऊन धान्य वितरणात अडचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 12:58 IST