लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरात कचरा संकलनासाठी देण्यात आलेला ठेका पदाधिकारी व नगरसेवकांच्या दबाववजा तक्रारींमुळे अखेर रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे़ त्यासंदर्भात आयुक्तांनी दुपारी तातडीची बैठक बोलावली असून बैठकीत त्याबाबत सविस्तर चर्चा होणार आहे़ त्यामुळे औरंगाबादनंतर आता धुळयातही कचरा प्रश्न पेटण्याची शक्यता आहे़महानगरपालिकेत तब्बल तीन वर्षे रेंगाळलेला कचरा संकलनाचा प्रश्न गेल्या वर्षी आयुक्त सुधाकर देशमुख यांनी मार्गी लावला होता़ शहराचे चार भागात वर्गीकरण करून कचरा संकलनाचा ठेका देण्यात आला होता़ सुमारे ४ कोटी रूपये खर्चाचा हा ठेका देण्यात आल्यापासून ठेकेदाराबाबत सातत्याने तक्रारी होत आहेत़ त्यामुळे आयुक्तांनी ठेकेदाराला अनेकदा नोटीसा बजाविल्या असून वारंवार दंडात्मक कारवाई देखील ठेकेदारावर केली आहे़ मात्र असे असून देखील कचरा संकलनाचा ठेका रद्द करण्याची मागणी पदाधिकारी, नगरसेवकांकडून होत असल्याने आता ठेका रद्द करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे़ कचरा संकलनाचा ठेका रद्द झाल्यास शहरात कचराकोंडीची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे़ त्यामुळे येत्या काळात औरंगाबादनंतर धुळे शहरातही कचºयाचा प्रश्न पेटण्याची दाट शक्यता आहे़
धुळयात कचरा संकलनाचा प्रश्न पेटण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 15:19 IST
पदाधिकारी, नगरसेवकांच्या तक्रारींमुळे कचरा संकलनाचा ठेका होणार रद्द, आयुक्तांनी बोलाविली तातडीची बैठक
धुळयात कचरा संकलनाचा प्रश्न पेटण्याची शक्यता
ठळक मुद्दे- कचरा संकलन ठेकेदाराबाबत वारंवार तक्रारी- आयुक्तांनी बोलाविली स्वच्छता विभागाची तातडीची बैठक- शहरात कचराकोंडीची समस्या निर्माण होण्याची शक्यता