शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
2
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
3
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
4
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
5
Success Story: रोल्स रॉयस ते हेलिकॉप्टरचे मालक, शेतकऱ्याच्या मुलानं शून्यातून उभं केलं जग
6
‘अशी’ करा स्वामी समर्थ महाराजांची मानस पूजा; होईल अपार कृपा, अशक्यही शक्य करतील स्वामी!
7
१२ वर्षांनी गजलक्ष्मी राजयोग: ८ राशींवर लक्ष्मीकृपा, उत्पन्न वाढ; नवी नोकरीची संधी, शुभ होईल
8
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
9
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
10
LIC चा केंद्राला ३,६६२ कोटींचा लाभांश; RBI देखील सरकारला देणार २.११ लाख कोटी
11
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
12
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
13
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
14
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
15
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
16
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
17
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
18
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
19
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...

धुळ्यातील यात्रोत्सवात संसारपयोगी साहित्य खरेदी करण्यास प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2018 4:10 PM

चायनिज ज्वेलरी वेधताहेत भाविकांचे लक्ष; यात्रेत लाखो रुपयांची उलाढाल

ठळक मुद्देचैत्र पौर्णिमेपासून यात्रोत्सवाला सुरुवात झालविक्रेत्यांनी स्वत: तयार केल्या वस्तूचायनिज अलंकाराचे आकर्षण

आॅनलाइन लोकमतधुळे : खान्देश कुलस्वामिनी एकवीरा देवी यात्रोत्सवात भाविकांची गर्दी वाढण्यास सुरुवात झाली आहे. दर्शन घेतल्यानंतर भाविक यात्रेत फिरून  संसारपयोगी साहित्य खरेदीला विशेष प्राधान्य देत आहेत. तर अनेक महिलांना चायनिज ज्वेलरींनी भुरळ घातली आहे. यात्रेत खरेदी वाढल्याने लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. दरम्यान, शहरातील विविध महाविद्यालयातील तरुण-तरुणीही यात्रेत धमाल करत असल्याचे दिसून येते.चैत्र पौर्णिमेपासून यात्रोत्सवाला सुरुवात झाली. यात्रेत धुळे शहरासह तालुक्यातील सोनगीर, नगाव, देवभाणे, मुकटी, फागणे, कुसुंबा, नेर, आर्वी, मोहाडी उपनगर परिसरातील भाविक मोठ्या संख्येने यात्रेत येऊ लागले आहेत. यात्रेत कुटुंबाचा गाडा पुढे रेटण्यासाठी अनेक जण हाताला जे काम मिळेल, ते करताना दिसत आहे. बहुतांश विक्रेत्यांनी स्वत: तयार केलेल्या वस्तू विक्रीसाठी ठेवल्या आहेत. या वस्तूंना भाविकांकडून विशेष मागणी मिळत आहे.विक्रेत्यांनी स्वत: तयार केल्या वस्तूएकवीरादेवी मंदिर परिसर ते पुढे पंचवटीपर्यंत विक्रेत्यांनी जी दुकाने लावली आहेत. पैकी तीन विक्रेत्यांनी चक्क खराब लाकडापासून संसारपयोगी वस्तू तयार केल्या आहेत. त्यात पोळपाट, लाटणे, पाट, बॅट या वस्तूंचा समावेश असून तर याच विक्रेत्यांनी बटाटे, कैºया व टोमॅटो कापण्यासाठी लागणारे यंत्र, एवढेच नव्हे; तर शेंगदाण्याचा कूट तयार करण्यासाठी लागणारे छोटे मिक्सर स्वत: तयार केले आहे. या वस्तूंची किंमत  ३० ते ५५० रुपयांपर्यंतच्या असल्याची माहिती सैय्यद शेख या विक्रेत्याने दिली.चायनिज अलंकाराचे आकर्षणएकवीरादेवी मंदिराकडून पुढे पंचवटीकडे जाणाºया रस्त्यावर तीन ते चार विक्रेत्यांनी खास चायनिज दागिने विक्रीसाठी त्यांच्या दुकानावर ठेवली आहेत. यात कानातले, हातातील बांगड्या व गळ्यातील नेक्लेस अशा दागिन्यांचा समावेश आहे. ज्या भाविकांना सोन्याचे महागडे अलंकर घेणे शक्य नाही, असे भाविक चायनिज अलंकर खरेदी करताना दिसत आहेत. या दागिन्यांची किंमत २५० ते ५५० रुपयांपर्यंत असल्याचे बाबू शेठ या विक्रेत्याने सांगितले. शहरातील विविध महाविद्यालयातील अनेक तरुणी फॅन्सी प्रकारातील चप्पल व इतर साहित्य  खरेदी करत आहेत.  तरुण वर्गही  पाळण्यांमध्ये बसून मज्जा लुटत आहेत. 

टॅग्स :Dhuleधुळे