शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचा वेतन, निवडश्रेणीचा प्रश्न मार्गी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 12:01 IST

जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीची बैठक : उपमुख्यकार्यकारी अधिकाºयांनी दिले आश्वासन

ठळक मुद्देया सोबतच प्राथमिक शिक्षकांना कायम नियुक्ती आदेश देणे, शालेय पोषण आहार मानधन, इंधन बिले वेळेवर मिळावेत, शालार्थ वेतन प्रणालीतील त्रृटी दूर करून, पगार वेळेवर अदा करावेत, एलआयसीचे हप्ते पगारातून कपात करणे, मुख्याध्यापक, विषय शिक्षक, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुखांची रिक्त पदे त्वरीत भरणे, मोफत गणवेशाचे विद्यार्थ्यांचे संयुक्त खाते पालकांच्या नावे उघडण्यात यावे, जिल्हा शिक्षण विभागात लिपीकवर्गीय कर्मचाºयांची संख्याशिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबात तालुका व जिल्हास्तरावर टोकणपद्धत सुरू करावी यांसह विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. या मागण्या लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असलेला  वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणीचा प्रश्न लवकरात लवकर सोडण्याचे आश्वासन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर आभाळे यांनी दिले. जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. यादृष्टीने  जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या मागणीनुसार नुकतीच  जिल्हा परिषदेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये  उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर आभाळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी व्यासपीठावर प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मोहन देसले, गटशिक्षणाधिकारी पी.टी. शिंदे, पी.बी. भिल (साक्री) होते.   यावेळी १२ वर्षे सेवा पूर्ण करणाºया शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी व २४ वर्षे पूर्ण सेवा केलेल्या शिक्षकांना निवड श्रेणी तातडीने लागू करण्याचे आश्वासन देण्यात आले. यावेळी  समन्वयक समितीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील, किशोर भामरे, राजेंद्र खैरनार, राजेंद्र नांद्रे, राजेंद्र जाधव, विजय पाटील, बापू पारधी, शरद पाटील, विश्वनाथ सोमवंशी, गणेश वाघ, भूपेश वाघ, चंद्रकांत सत्तेसा, ज्ञानेश्वर पवार, शांताराम देवरे व समन्वय समितीचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.