तब्बल दोन किलोमीटर अंतरापर्यंत होती शोभायात्रा, हजारो भाविक सहभागीआॅनलाइन लोकमतशिरपूर (जि.धुळे) : शिरपूर-चोपडा मार्गावरील अजनाड बंगला गावाजवळील नागेश्वर येथे नागेश्वर सेवा संस्थानच्यावतीने प्राणप्रतिष्ठा व कलशरोहण सोहळ्यासह विविध धार्मिक कार्यक्रमाला सोमवारपासून जल्लोषात सुरूवात झाली़ तब्बल २ किलोमीटर अंतरापर्यंत शोभायात्रा काढून हजारो भाविक सहभागी झाले होते़२४ रोजी अजनाड बंगला गावापासून सवाद्य मिरवणुकीला सुरूवात झाली़ अग्रभागी उंटस्वार, घोडेस्वार, मंगल वाद्य, गणेश मूर्तीचा रथ, बँण्ड पथक, शिवलिंगरथासह विविध रथ, वल्हर वाद्य, बंजारा नृत्य, आदिवासी नृत्य, नाशिक ढोलपथक, होते़ या मिरवणूकीत तब्बल १० वेगवेगळ्या रथावर मूर्ती ठेवल्या होत्या.घराघरांसमोर रांगोळी़़़अजनाड बंगला गावापासून मिरवणुकीला सुरूवात झाली़ गावातील प्रत्येक घरांसमोर रांगोळी व मंदिराच्या मार्गावर सुध्दा रांगोळी काढून परिसर सजविण्यात आला होता़संताची उपस्थिती़़़या चार दिवसीय सोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रमांसाठी राष्ट्रीय संत लक्ष्मण चैतन्य, राष्ट्रीय संत आनंद चैतन्य महाराज, सखाराम महाराज अमळनेरकर तसेच आशा दिदी दोंडाईचा, महेश महाराज बभळाज, डॉ.किमया आमले यांचे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.उद्या प्राणप्रतिष्ठा सोहळा़२६ रोजी सकाळी ७ वाजता प्रधान होम, कलशरोहण सोहळा, दुपारी १२ वाजता प्राणप्रतिष्ठा कलशरोहण तर सायंकाळी ७ वाजता राष्ट्रीय संत आनंद चैतन्य महाराज यांचा गीता रामायण सत्संग व दिपोत्सव कार्यक्रम होईल. यावेळी हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.गुरूवारी महाप्रसाद वाटप़२७ रोजी सकाळी ८ वाजता उत्तरांग हवन, पूर्णाहूती आरती तर रात्री ८ वाजता राष्ट्रीय संत आनंद चैतन्य महाराज यांचा गीता रामायण सत्संग कार्यक्रम होईल. तत्पूर्वी, सकाळी ११ वाजेपासून महाप्रसाद वाटप करण्यात येईल.
शिरपूर तालुक्यातील श्रीक्षेत्र नागेश्वर येथे प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास थाटात सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 12:05 IST