मालपूर परिसरातील तीनही दुकानातून मागील दोन महिन्यांपासून अत्यंत निकृष्ट दर्जाचा तांदुळाचे वितरण सुरू आहे. यापेक्षा पोल्ट्री फार्मवर कोंबड्यांचे खाद्यही चांगले असते. सरकारने द्यायचे असेल, तर चांगले धान्य द्यावे, अन्यथा धान्यपुरवठा बंद करून, आमच्या गरिबांची चाललेली थट्टा थांबवावी, असे लाभार्थ्यांना यावेळी मागणी केली आहे.
सध्या गरीब कुटुंब कल्याण योजनेंतर्गत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून मोफत, तसेच राज्य सरकारच्या वतीने मासिक बी.पी. एल. अंत्योदय, निराधार आदी लाभार्थ्यांना एकत्रित धान्यपुरवठा येथे सुरू आहे. यामुळे काही लाभार्थी निकृष्ट प्रतीचा माल बघून घेण्याचे टाळत आहे, तर काही गरजू इच्छा नसताना नाईलाजास्तव धान्य घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे दुकानदारांचीही डोकेदुखी वाढली असून, लाभार्थीच्या रोषाला सर्व प्रथम आम्हालाच सामोरे जावे लागत आहे. यामुळे पुरवठा विभागाने त्वरित लक्ष घालून येथील धान्यपुरवठा चांगल्या दर्जाचा होईल, याकडे लक्ष केंद्रित करावे, अशी येथील लाभार्थ्यांनी मागणी केली आहे.
प्रतिक्रिया : शासकीय गोदामामध्ये जो माल येतो, तो वितरण करण्यात येतो. सध्या जो धान्यपुरवठा केला जात आहे, तो उत्तम प्रतिचा आहे. चांगला आहे.
हर्षा दुधे
तालुका पुरवठा अधिकारी शिंदखेडा
040921\img-20210826-wa0009.jpg
फोटो :- मालपूर येथील स्वस्त धान्य दुकानासमोर निकृष्ट दर्जाचे धान्य घ्यावे कि नाही या विवंचनेत असलेले लाभार्थी.