शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

Dhule Municipal Election 2018 : मनपा निवडणुकीसाठी आज मतदान, अफवांचे पीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 12:44 IST

 पैसे वाटपाच्या संशयावरुन एकावर चाकू हला,तर एकाला ४९ हजारासोबत एकाला पकडले

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मनपा निवडणुकीच्या ७४ जागांसाठीच्या ३५५ उमेदवारांचे भवितव्य रविवारी मतदान यंत्रात बंद होणार आहे. दरम्यान, मतदानाच्या आदल्यादिवशी आमदार अनिल गोटे  आणि भाजपचे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांच्याकडून पत्रकार परिषदेतून आरोप - प्रत्यारोप करण्यात आले. तर  पैसे वाटपाच्या संशयावरुन दोन जणांवर चाकू हल्ला आणि सायंकाळी  मनपाच्या प्रभारी पथकाने ५९ हजाराच्या रक्कमेसह एकाला पैसे वाटप करण्याच्या संशयावरुन पकडल्याची घटना घडल्याने शहरात अफवांचे पीक पसरले आहे.धुळे महापालिका निवडणुकीसाठी रविवारी १९ प्रभागातून ७४ जागांसाठी मतदान होणार आहे. निवडणुकीत एकूण ३५५ उमेदवार रिंगणात उभे आहेत. निवडणुकीत भाजप विरोधात आमदार अनिल गोटे यांचे लोकसंग्राम, राष्ट्रवादी - काँग्रेस आघाडी आणि शिवसेना अशी लढत होत आहे. भाजपविरोधात सर्वच पक्ष एकवटले आहे.आमदारांचा आरोप - शनिवारी दुपारी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेतून निवडणुकीत भाजपकडून पैशांचे वाटप होत असल्याचा आरोप केला. तसेच पैसे वाटप करणाºयाला पकडले तर लोकसंग्रामच्या दोन लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तो गुन्हा मागे नाही घेतला तर आपण उपोषणाला बसू असा इशारा दिला. तसेच आपण राजीनामा देणार नाही. आता पक्षाने मला काढावे, मग मी सांगेल की मी गुंडगिरीविरोधात बोललो म्हणून मला पक्षाने काढले, असेही आमदार गोटे म्हणाले.दोन जणांवर चाकू हल्ला - शनिवारी पहाटे नकाणे रोडवर गोकर्ण सोसायटीत   पैसे वाटप करीत असल्याच्या संशयावरुन दोन जणांवर चाकू हल्ला करण्यात आला. याप्रकरणी जखमींनी दिलेल्या फिर्यादीवरुन लोकसंग्रामच्या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाला पकडले- सायंकाळी मिल परिसरातील समता नगरात महापालिकेच्या भरारी पथकाने पैसे वाटपाच्या संशयावरुन एकास ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याबरोबर असलेले दोन ते तीन जण फरार झाले.  संशयिताकडे ४९ हजार रोख आणि मतदारांची यादी आढळून आली आहे. संशयिताला शहर पोलीस स्टेशनला आणले आहे. 

टॅग्स :DhuleधुळेDhule Municipal Election 2018धुळे महापालिका निवडणूक