धुळे : राज्य शासनाच्या आदेशानुसार ० ते ५ वर्ष वयोगटातील शहरातील ६१ हजार ५८६ बालकांना १९ रोजी लसीकरण केले जाणार आहे़ त्यासाठी मनपा आरोग्य केंद्रामार्फेत १६५ केंद्रावर लसीकरणाची व्यवस्था केली आहे़ अशी माहिती मनपा आरोग्य अधिकारी डॉ़ महेश मोरे यांनी सांगितले़महापालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृहात मंगळवारी पोलीस लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी नियोजन बैठक घेण्यात आली़ यावेळी डॉ़ मोरे म्हणाले की, ० ते ५ वयोगटातील अपेक्षित लाभार्थी ६१ हजार ५८६ बालकांना पोलीओ डोस देण्याचे उदिष्टे देण्यात आले़ लसीकरणासाठी गैरसोय होऊ नये, यासाठी शहरातील १६५ ठिकाणी बुथ नियुक्त केले जाणार आहे़ बसस्थानक, रेल्वे स्टेशन, उद्यान, बस थांबे, वीटाभट्या, नवीन बांधकाम अशा १३ ठिकाणी ट्राझीट टीमची व्यवस्था केली आहे़ तसेच हॉस्पिटल व रस्त्यावरील लाभार्थ्यांसाठी ९ मोबाईल टीम व ३३ पर्यवेक्षक नियुक्त केले आहेत़ तर ५९३ मनुष्यबळाची व्यवस्था केलेली असल्याचेही डॉ़ मोरे यांनी सांगितले़
१६५ केंद्रातून ६१ हजार बालकांना पोलीओ लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 22:49 IST