शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

महाळपूर हातभट्टीवर पोलिसांची धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 21:48 IST

जिल्ह्यात ठिकठिकाणी दारु जप्त : मुद्देमालाची जागेवरच विल्हेवाट, संशयित जेरबंद

ठळक मुद्देपोलिसांच्या पथकात गावठी दारु हस्तगतसंशयितांनाही केले जेरबंद

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे/शिंदखेडा : शिंदखेडा तालुका पोलीस स्टेशनअंतर्गत चिमठाणे औटपोस्टच्या कर्मचाºयांनी त्यांच्या हद्दीतील महाळपुर व निशाणे शिवारात बुराई नदी काठावरील कपाशीच्या शेतालगत मोठ्या प्रमाणात हातभट्टीची दारू तयार होत असल्याची माहिती एका महिलेने पोलिसांना दिली़ माहिती मिळताच पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून सुमारे ८५ हजाराची दारुसह अनुषंगिक साहित्य व प्लास्टिकचे मोठे ३० ड्रम असा मुद्देमालासह रसायन नष्ट केले़ आत्तापर्यंतची पोलिसांची सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे़शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चिमठाणे दुरक्षेत्रचे   सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश चव्हाण यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक वसंत पाटील, पोलीस कर्मचारी भटू चौधरी, अविनाश लोखंडे, प्रकाश माळी यांच्या पथकाने महाराष्ट्र दारुबंदी महीला मोर्चाच्या गितांजली कोळी यांच्या सोबत बुधवारी दुपारी बुराई नदी काठी शेतात ही कारवाई केली़ शिंदखेडा तालुक्यातील महाळपूर व निशाणे हद्दीतील नदीकाठी असलेल्या शेतात छापा टाकून सुमारे ८५ हजाराचे रसायनाचा साठा, प्लॅस्टिकच्या ३० ड्रममध्ये ठेवण्यात आलेला गुळ आणि नवसागर याचे रसायन भरले होते़ हा मुद्देमाल यावेळी नष्ट करण्यात आला़ मात्र, यावेळी घटनास्थळी कोणीही आढळून न आल्याने गुन्हा दाखल झालेला नाही़ एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध गावठी दारु नष्ट करण्यात आल्याने निशाणे व महाळपूर गावातील महिला व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले़ शहरासह जिल्ह्यात पोलिसांच्या पथकाने छापा टाकत हातभट्टीची दारु जप्त करत तिची विल्हेवाट लावली आहे़ याप्रकरणी ६ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे़ दरम्यान, जप्त केलेल्या दारुची ४ हजार ८३० किंमत आहे़ जिल्ह्यातही दारु जप्तसाक्री तालुक्यातील गव्हाणीपाडा येथे गावठी हातभट्टीची दारु बेकायदेशिरपणे चोरटी विक्री करताना रविंद्र नामदेव सोनवणे (२२) या संशयिताला पकडण्यात आले़ त्याच्याकडून ४१० रुपये किंमतीची १० लिटर गावठी दारु जप्त करण्यात आली़ याप्रकरणी पोलीस कर्मचारी मनोज अशोक बैसाणे यांनी पिंपळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे़ साक्री तालुक्यातील पानखेडा येथे गावठी हातभट्टीची दारु बेकायदेशिरपणे चोरटी विक्री करताना हिरामण हिंमत सोनवणे (६२) या संशयिताला पकडण्यात आले़ त्याच्याकडून ३६० रुपये किंमतीची ८ लिटर गावठी दारु जप्त करण्यात आली़ याप्रकरणी पोलीस कर्मचारी प्रशांत अशोक शिंपी यांनी पिंपळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे़ धुळे तालुक्यातील मोराणे गावातील भिलाटीत गावठी हातभट्टीची दारु बेकायदेशिरपणे चोरटी विक्री करताना ३८ वर्षीय संजय नामक तरुण संशयिताला पकडण्यात आले़ त्याच्याकडून १ हजार ५० रुपये किंमतीची २५ लिटर गावठी दारु जप्त करण्यात आली़ याप्रकरणी पोलीस कर्मचारी उमेश गावित यांनी धुळे तालुका पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे़ शिंदखेडा तालुक्यातील मुडावद येथे पांढºया रंगाची ताडी बेकायदेशिरपणे चोरटी विक्री करताना कलाबाई पिरन शिरसाठ (५०) या संशयित महिलेला पकडण्यात आले़ तिच्याकडून ५१० रुपये किंमतीची २० लिटर पांढºया रंगाची ताडी जप्त करण्यात आली़ याप्रकरणी पोलीस कर्मचारी सचिन वसंत वाघ यांनी शिंदखेडा पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे़साक्री तालुक्यातील सातआंबा येथे गावठी हातभट्टीची दारु बेकायदेशिरपणे चोरटी विक्री करताना हिराजी पुन्या मालचे (४५) या संशयिताला पकडण्यात आले़ त्याच्याकडून ६०० रुपये किंमतीची एक प्लॅस्टिकची कॅन गावठी दारु जप्त करण्यात आली़ याप्रकरणी पोलीस कर्मचारी शरद एकनाथ चौरे यांनी पिंपळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे़ धुळे शहरातील मालेगाव रोडलगत काटेरी झुडूपात गावठी हातभट्टीची दारु बेकायदेशिरपणे चोरटी विक्री करताना श्याम रामचंद्र दिघे (६०) या संशयिताला पकडण्यात आले़ त्याच्याकडून २ हजार रुपये किंमतीची २५ लिटर गावठी दारु जप्त करण्यात आली़ याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे मयूर पाटील यांनी धुळे शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी