सांगवी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दहिवद शिवारातील आरणा कॉटस स्पिन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या सुरू असलेल्या बांधकामावरुन चोरट्यांनी एकूण २०० किलो वजनाच्या लोखंडी सळईचा रिंगचा माल चोरून नेला होता. याबाबत गेल्या महिन्यात सांगवी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास कामी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांनी एक पथक स्थापन करून चोरट्यांचा शोध सुरु केला़ तपासा दरम्यान गोपनीय बातमीदार मार्फत मिळालेल्या माहितीनुसार काही संशयित व्यक्तींबाबत माहिती काढण्यात आली़ त्यांच्या चौकशीतून संशयित सुनील गंगा पावरा, दारासिंग अमाशा पावरा, किरण नारायण भील (सर्व राहणार दहिवद ता़शिरपूर) यांना जेरबंद केले़ आरोपींनी गुन्ह्याची कबुली देत चोरीचा मुद्देमाल सुनीता अर्जुन पावरा (रा़ दहिवद) यांना विक्री केल्याचे कबूल केले़ पोलिसांनी तिच्याकडून चोरीचा माल देखील जप्त केला़
उपअधीक्षक अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ, पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र खैरनार, दीपक वारे, कर्मचारी करनकाळ, नियाज शेख, हेमंत पाटील, संजय देवरे, सईद शेख, योगेश मोरे, प्रकाश भील यांच्या पथकाने ही कारवाई केली़