शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मिडियावर चुकीची पोस्ट टाकून आमदारांची बदनामी केल्याप्रकरणी हर्षल विभांडीक विरोधात पोलिसात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 13:43 IST

मोबाईल हॅक झाला असून तपासासाठी पोलिसात मोबाईल जमा, विभांडीक यांची माहिती

ठळक मुद्देबदनामीकारक पोस्ट प्रकरणी गुन्हा दाखलमोबाईल हॅक झाल्याचा होतोय दावा

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : सोशल मीडियावरुन आमदार अनिल गोटे, भारतीय सेना, केंद्र सरकार आणि राज्य सरकार तसेच भारतीय जनता पार्टीची बदनामी करण्यात आल्याप्रकरणी योगेश मुकुंदे यांनी हर्षल विभांडीक यांच्याविरोधात  फिर्याद दाखल केली. फिर्यादीनुसार शहर पोलीस स्टेशनला विभांडीक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान  कोणीतरी माझा मोबाईल हॅक करुन हा प्रकार केला आहे. मोबाईल हॅकर शोधण्यासाठी आपण स्वत:च आपला मोबाईल   पोलिसांकडे सुपुर्द केला, असल्याची माहिती डिजिटल क्रांतीचे प्रणेते हर्षल विभांडीक यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.आमदार अनिल गोटे यांच्या नावाने व्हॉटसअप व सोशल मीडियावरील इतर माध्यमातून भारतीय सेना, केंद्र आणि राज्य सरकार, भाजपा तसेच आमदार गोटे यांच्यासह भाजपाच्या आजी-माजी पदाधिकाºयांची समाजात बदनामी व्हावी म्हणून एक बनावट व दिशाभूल करणारी बदनामीकारक असत्य कथन करणारी पोस्ट व्हायरल झाली़ या पोस्टमध्ये भाजपनेते सुनील नेरकर, भिमसिंग राजपूत, संजय बोरसे, चेतन महाले, शिरीष शर्मा, अमित खोपडे, अमोल भागवत, नितीन शिंदे, रवि शुक्ला, हेमंत मराठे, नंदू ठोंबरे, दादाभाऊ पहाडी, स्वप्निल कुलकर्णी  हे २ आॅक्टोबर रोजी लोकसंग्राममध्ये प्रवेश करणार आहे़ तसेच यापुढील निवडणूका लोकसंग्रामतर्फे लढवू याशिवाय इतर बदनामी करणारा, दिशाभूल करणारा मजकूरही पोस्टमध्ये टाकण्यात आला़ याप्रकरणी पोलिसात फिर्याद दाखल झाल्यानंतर अशोक नगरात राहणाºया हर्षल विभांडीक यांच्याकडे अंगुलीनिर्देश करण्यात आला़ संशयावरुन त्याच्या विरोधात शहर पोलीस स्टेशनला फिर्याद देखील झाली़ मुलाखतीचे कात्रण सोशल मीडियाद्वारे पाठवित असताना त्यांच्या मोबाईद्वारे एक मेसेज ३ जणांना गेल्याचे लक्षात आले़ त्या तीन मित्रांना ताबडतोब फोन व मेसेजद्वारे खुलासाही करण्यात आला़ संध्याकाळी मुंबईच्या मित्राद्वारे असे लक्षात आले की कोणीतरी फोन हॅक केला आहे़ ही बाब लक्षात आल्यावर बँकींग व सोशल मीडियावरचे अ‍ॅप तात्काळ डिलिट करण्यात आले़ पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे फोन हा तपासणीसाठी देण्यात आला असल्याचे हर्षल विभांडीक यांनी सांगितले़  

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी