शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये पोलीस अन् होमगार्डमध्ये झुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 19:50 IST

दिवसभर चर्चा : वशिलेबाजी होत असल्याचा नागरिकांचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील देवपूर भागात असलेल्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक येथील महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये बुधवारी सकाळी पोलीस आणि होमगार्ड यांच्यात चांगलीच धुमश्चक्री झाली़ दिवसभर हा विषय चर्चेचा होता़ दरम्यान, स्वॅब तपासणीच्या ठिकाणी वशिलेबाजी होत असल्याचा आरोप काही नागरिकांनी केला़सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वॅब तपासणीसाठी देवपुरातील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक येथील महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये गर्दी होत आहे़ सकाळपासूनच तपासणी करण्यासाठी रांगा लागलेल्या असतात़ अचानक एकाने येऊन थेट आतमध्ये प्रवेश केल्याने रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांनी हरकत घेतली़ एवढ्यावरच न थांबता नागरिकांनी बंदोबस्तावर असलेल्या होमगार्डला देखील टोकले आणि कोणीही मध्ये येतच कसे याची विचारणा केली़ यावेळी आपण पोलीस असल्याचे सांगत वाद घालण्यास सुरुवात केली़ अखेरीस नागरिकांच्या विरोधामुळे या पोलिसाला माघार घ्यावी लागली असलीतरी त्याने होमगार्डशी हुज्जत घालण्याचा केलेला प्रकार चुकीचा असल्याची चर्चा या ठिकाणी होती़तसेच रुग्णांच्या स्वॅब तपासणीत कोविड सेंटरमधील डॉक्टर आणि त्यांच्या सोबत असलेल्या स्टाफ हे वशिलेबाजी करत असल्याचा आरोप काही नागरिकांनी केला़ अनेक नागरिक सकाळपासून स्वॅब तपासणीसाठी नंबर लावून उभे राहतात़ परंतु मध्येच कोणीतरी फोनवर बोलवले जाते आणि आतमध्ये सोडले जाते़ त्यातून हा वाद उदभवल्याची चर्चा याठिकाणी सुरु होती़ होमगार्ड आणि पोलिस यांच्यात झालेल्या वादाची चर्चा होती़ मात्र, पोलिसात नोंद नाही़