शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

धुळे कारागृहावर बॉम्ब फेकण्याचे कळताच पोलीस ‘अलर्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 22:34 IST

औरंगाबादहून आला संदेश : कसून झाली तपासणी, शेवटी ठरली अफवा

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे :  येथील जिल्हा कारागृहावर बॉम्ब फेकणार असल्याची माहिती औरंगाबादहून धुळे कंट्रोल रुमला धडकताच पोलीस क्षणार्धात ‘अलर्ट’ झाले़ क्षणाचाही विलंब न करता शहर पोलीस निरीक्षकांसह श्वान पथक, बॉम्ब शोधक पथक आणि पोलीस कर्मचाºयांनी जिल्हा कारागृह गाठले़ अडीच ते पावणे तीन तास तपासणी सुरु होती़ अखेर ही अफवा ठरली असलीतरी कारागृहाच्या बाहेर मात्र पोलिसांचा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता़ औरंगाबाद येथील पोलीस कंट्रोल रुमला कोणीतरी एका इसमाने मोबाईलवरुन संपर्क साधत धुळे कारागृहावर बॉम्ब फेकणार आहे, अशी माहिती मिळाल्यानंतर तेथील पोलीस यंत्रणेने धुळे कंट्रोल रुमला या घटनेची माहिती दिली़ बॉम्ब फेकणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर कंट्रोल रुमने शहर पोलिसांना या गंभीर अशा घटनेची माहिती दिली़ लागलीच शहर पोलीस निरीक्षक गणेश चौधरी यांनी श्वान पथक, बॉम्ब शोधक पथकाला कळविले आणि तात्काळ कारागृहाजवळ येण्याच्या सुचना केल्या़ अवघ्या काही मिनीटांत यंत्रणा अलर्ट झाली़ पोलीस निरीक्षक चौधरी यांनी या घटनेची माहिती कारागृह अधीक्षक वैभव आगे यांना प्रत्यक्ष जावून कळविली आणि सुरु झाली तपासणी़दुपारी साडेतीन वाजेला फोन कॉल आल्यानंतर सर्व यंत्रणा सज्ज झाली़ कारागृहाच्या बाहेर सुरुवातीला कसुन तपासणी झाल्यानंतर पथकाने कारागृहातील आतमध्ये प्रवेश केला़ याठिकाणी सर्व भागात कसून तपासणी करण्यात आली़ सायंकाळी सव्वा सहा वाजेपर्यंत तपासणी सुरुच होती़ त्याचवेळेस अग्नीशमन बंबाला देखील पाचारण करण्यात आले होते़ पण, विशिष्ठ वेळेपर्यंत तपासणी झाल्यानंतर बॉम्ब कुठेही नाही हे समजल्यानंतर अग्नीशमन बंबाला पुन्हा माघारी पाठविण्यात आले़ शहर पोलिसांच्या पथकाने कारागृहाजवळ येताच परिसरात लावण्यात आलेल्या लोटगाड्या तात्काळ हटविल्या़ रस्ता मोकळा केला़ कारागृहाबाहेर जमा होत असलेली गर्दी पोलिसांनी पांगविली़ याठिकाणी बंदोबस्त कायम होता़ ज्या मोबाईलवरुन हा औरंगाबाद येथे कॉल आला तो मिळविण्यात आला आहे़ नंबरच्या चौकशीसंदर्भात सायबर सेलला माहिती कळविण्यात आली आहे़ लवकरच ही माहिती मिळेल अशा विश्वास आहे़ त्यानंतर लागलीच संबंधिताची चौकशी करुन कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती शहर पोलीस निरीक्षक गणेश चौधरी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले़ दरम्यान, ही अफवा ठरली असलीतरी पोलिसांचा बंदोबस्त लावला असल्याचे त्यांनी सांगितले़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी