बेशिस्त पार्किंग
धुळे : महानगरपालिकेच्या पार्किंग लाॅटमध्ये अतिशय बेशिस्तपणे वाहने पार्क केली जात आहे. दुचाकी गाड्या कुठेही लावल्या जात असल्याने अधिकाऱ्यांची शासकीय वाहने पार्क करण्यासाठी जागा शिल्लक राहत नाही.
महिनाभराचा बाजार
धुळे : लाॅकडाऊन वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन ग्रामीण भागातील महिला शहरात येऊन महिनाभराचा बाजार करुन घेत आहेत. पाचकंदील चाैकातून बाजार घेऊन जाणाऱ्या महिला दिसून येत आहेत.
गर्दीवर नियंत्रण हवे
धुळे : भाजीपाला, किराणा दुकाने, रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने आदी ठिकाणी गर्दी होत आहे. या गर्दीला पाहून लाॅकडाऊन झाले आहे असे वाटत नाही. अशीच गर्दी होत असेल तर लाॅकडाऊनचा काय फायदा असा प्रश्न आहे.
प्रदूषण वाढले
धुळे : पांझरा नदीकाठच्या वस्त्यांमधील रहिवाशांचे सांडपाणी थेट नदीपात्रात येत असल्याने नदीमध्ये प्रदूषण वाढले आहे. नदीच्या प्रवाहाला गटारीचे स्वरुप आले असून दुर्गंधी पसरली आहे. प्लास्टिकचा कचरा देखील आहे.