शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

धुळे विभागातून नांदुरी गडासाठी ३१० बसेस सोडण्याचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 12:19 IST

विभागाला १ कोटी ३६ लाखांचे उत्पन्न अपेक्षित, लाभ घेण्याचे आवाहन

ठळक मुद्देधुळे विभागातर्फे चैत्रोत्सवासाठी नियोजनआगारनिहाय सोडण्यात येणार जादा बसेस९ दिवसात एक कोटी ३६ लाखांचे उत्पन्न अपेक्षित

आॅनलाईन लोकमतधुळे : भाविकांचे श्रद्धास्थान असलले महाराष्टÑातील साडेतीन पीठापैकी एक शक्तीपीठ म्हणून गणल्या जाणाºया सप्तश्रृंगी देवीच्या चैत्र यात्रोत्सवास प्रारंभ झालेला आहे.   यात्रोत्सवात गडावर देवीच्या दर्शनासाठी जाणाºया भाविकांची संख्या प्रचंड आहे. भाविकांच्या सोयीसाठी  एस. टी. महामंडळाच्या धुळे विभागातील ९ आगारांमार्फत नांदुरी गडासाठी ३१० जादा बसेस सोडण्यात येणार आहे.  यातून  धुळे विभागाला एक कोटी ३६ लाखांचे  उत्पन्न अपेक्षित आहे. सप्तश्रृंगी गडावर चैत्र महिन्यात यात्रा भरत असते. या यात्रोत्सवादरम्यान खान्देशातील  हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी गडावर असतात.यातील काही पायी तर काही महामंडळाच्या बसने गडावर जातात.  गडावर जाणाºया भाविकांसाठी महामंडळातर्फे दरवर्षी जादा बसेस सोडण्यात येत असतात.  यावर्षीही धुळे विभागातर्फे नांदुरीगडासाठी आगारनिहाय जादा बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले  आहे. २५ मार्च   ते २  एप्रिल २०१८  अशा ९ दिवसांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.आगारनिहाय सोडण्यात येणाºया बसेस अशा- धुळे ६० बसेस, शिरपूर ६०, साक्री-३२, शिंदखेडा- १८, दोंडाईचा -२०, नंदुरबार-५०, शहादा-३०, नवापूर-३०, अक्कलकुवा-१० अशा एकूण ३१० बसेस सोडण्यात येणार आहे.गेल्यावर्षीही अशाच प्रकारे नांदुरीगडासाठी जादा बसेस सोडण्यात आलेल्या होत्या.त्यातून १ कोटी १३ लाख ७ हजार रूपयांचे उत्पन्न धुळे विभागाला मिळाले होते.यावर्षी या यात्रोत्सवातून एक कोटी ३६ लाखाचे उत्पन्न मिळणे अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान यात्रोत्सवाच्या कालावधीत महामंडळाचे सुमारे ७० अधिकारी, व कर्मचारी गडावर उपस्थित राहणार आहेत.लाभ घेण्याचे आवाहनएस.टी.महामंडळाच्या धुळे विभागातर्फे भाविकांच्या सोयीसाठी जादा बसेस सोडण्यात येत असून, त्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

टॅग्स :Dhuleधुळेstate transportराज्य परीवहन महामंडळ