सोनगीर : मुंबई आग्रा महामार्गावर सोनगीरनजिक पाईपलाईन फुटल्यामुळे खड्डा तयार झाला आहे़ तो वेळीच न बुजल्यास अपघाताचा धोका निर्माण झाला आहे़धुळे शहराला पाणी पुरवठा करीत असलेल्या तापी योजनेच्या जलवाहिनीला सोनगीर फाट्यापासून काही अंतरावर हॉटेल सुरभीच्या समोर अचानक गळती लागली होती़ याप्रसंगी लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहून गेले होते. यावेळी पाण्याच्या दाब मोठ्या प्रमाणात असल्याने महामार्गावर शिरपूरकडे जाणाऱ्या रस्त्यालगतची जमीन खचून मोठ्या आकाराचा खड्डा निर्माण झाला. यावेळी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ जलवाहिनीची दुरुस्ती करून धुळे शहराचा पाणीपुरवठा सुरळीत केला होता. मात्र जलवाहिनीच्या पाण्यामुळे निर्माण झालेला हा खड्डा महामार्गाला लागून असल्याने तो बुजण्याची जबाबदारी कोणाची? असा प्रश्न निर्माण होत आहे़ग्रामपंचायत सदस्याची मागणीमुंबई आग्रा महामार्गावरील शिरपूर कडे जाणाºया रस्त्याच्याकडेला धुळे शहराला पाणी पुरवठा करीत असलेली जलवाहिनी फुटल्याने पाण्याच्या दाबामुळे मोठा खड्डा तयार झाला आहे़ गेल्या दहा दिवसांपासून तश्याच स्थितीत हा खड्डा असल्याने या भागात अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे़ अपघाती क्षेत्र तयार होऊ लागले आहे़ हा खड्डा संबंधित यंत्रणेने जबाबदारीची जाणीव ठेवून तात्काळ बुजवावा अशी मागणी येथील ग्रामपंचायत सदस्य प्रेमल पटेल यांनी केली आहे.
मुंबई आग्रा महामार्गावर सोनगीरनजिक तयार होतोय खड्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 22:02 IST